Famous Marathi Actor Son’s Name Ceremony : मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ‘साधी माणसं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्याच्या घरी काही महिन्यांपूर्वी आनंदाची बातमी आली होती. आता त्या आनंदात आणखी भर पडली आहे. आकाश आणि त्याची पत्नी रुचिका धुरी यांच्या आयुष्यात नुकताच गोंडस बाळाचा आगमन झालं. ३ मार्च २०२६ रोजी या चिमुकल्याचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये बाळाच्या नावाचा बोर्ड उघडतानाचा सुंदर क्षण पाहायला मिळतो. या व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आकाश आणि रुचिका यांनी आपल्या मुलाचं नाव ‘अधिराज’ असं ठेवलं आहे. हे नाव समोर आल्यानंतर चाहत्यांनी या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत छोट्या अधिराजसाठी उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले आहेत.
आणखी वाचा – रश्मिका होणार आई? चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण
याशिवाय आकाश नलावडेने अनेक मालिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतल्या त्याच्या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. त्यानंतर ‘साधी माणसं’ या मालिकेत ‘सत्या’च्या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत त्याची आणि शिवानी बावकर यांची जोडी विशेष गाजली होती. सध्या आकाश नलावडे हा त्याच्या आयुष्यातील या नव्या टप्प्याचा मनापासून आनंद घेताना दिसत आहे.





