Rashmika and Vijay Devarkonda New Update : रश्मिका मंदाना ही साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण ही अभिनेत्री सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिची एक खास सोशल मीडिया पोस्ट. या पोस्टनंतर तिचे चाहते उत्सुक झाले असून ती लवकरच आई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अलीकडेच रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक आकर्षक ग्राफिक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिच्यासारखा आणि विजय देवरकोंडा यांच्यासारखा दिसणारा एक कपल दाखवण्यात आला आहे. त्या दोघांभोवती एक सुंदर पिवळं फुल फिरताना दिसतं, ज्यामुळे व्हिडीओला एक वेगळीच गोड भावना मिळते.
या व्हिडीओसोबत दिलेल्या “आता आम्ही तिघे झालो आहोत” या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी याचा अर्थ रश्मिका प्रेग्नेंट असल्याचा लावला असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.रश्मिका आणि विजय यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी पारंपरिक पद्धतीने लग्न केल्याची चर्चा आधीच रंगली होती. त्या वेळी त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
आता या नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा हे दोघे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, रश्मिकाने कुठेही थेट ती आई होणार असल्याच सांगितलेलं नाही. त्यामुळे तिची ही पोस्ट खरोखरच गुड न्यूज आहे की फक्त एखादा क्रिएटिव्ह प्रोजेक्ट किंवा प्रमोशन आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तिने या पोस्टमध्ये ‘Terribly Tiny Post’ या अकाउंटला टॅग केल्याने हा एखाद्या ब्रँड किंवा कॅम्पेनचा भाग असू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी चाहत्यांकडून अंदाज आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. रश्मिका आणि विजय या दोघांकडून याबाबत अधिकृत माहिती कधी येणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.



