Paaru Marathi Serial : ‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अनुष्काच्या एन्ट्रीने नकारात्मक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेतील अनुष्काच्या एन्ट्रीने पारू व आदित्य यांच्यात दुरावा निर्माण होत असल्याचं दिसत आहे. इतकंच नव्हे तर अनुष्काने किर्लोस्कर कुटुंबालाही नेस्तनाभूत करायचं ठरवलं आहे. तर अहिल्यादेवींच्या मनात जागा निर्माण करुन अनुष्काने पारूला त्यांच्या नजरेतून उतरवलं आहे. दिशाची बहीण अनुष्का ही बहिणीच्या अपमानाचा बदला घ्यायला आली आहे. अशातच आता मालिकेत अनुष्काने तिचे डाव आखून पारूला बाजू करण्याचा निश्चय केला आहे.
मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दिशाच्या हलगर्जीपणामुळे आणि पारूच्या चतुराईने व हिंमतीने ती किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबेसेडर होते. मात्र अनुष्का सर्वप्रथम पारू विरोधात अहिल्यादेवींच्या मनात विष पेरून हा ब्रँड अँबेसेडर होण्याचा मान स्वतःच मिळवते. मालिकेच्या प्रोमोमध्ये अहिल्यादेवी सर्व कुटुंबासमोर असं घोषित करतात की, “आजपासून किर्लोस्कर कंपनीची नवी ब्रँड अँबेसेडर म्हणून अनुष्का काम बघेल”. हे ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. तर पारूचाही चेहरा बघण्यासारखा होतो.
त्याचवेळी अनुष्का आदित्यकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्याला फोन करुन पारू स्वतःच ब्रँड अँबेसेडर होण्यास तयार नसल्याचं सांगते. हे ऐकून आदित्यही घाबरतो.
तर मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये, अहिल्यादेवी तात्काळ पत्रकार परिषद बोलवतात. यावेळी पारू सर्व पत्रकार बांधवांसमोर ब्रँड अँबेसेडर पद तिने स्वतःच नाकारलं असल्याचं सांगते. आणि त्याचवेळी अहिल्यादेवी पारूच्या शब्दात होकार मिळवत मोठी घोषणा करतात. अहिल्यादेवी यापुढे मोठी घोषणा करतात, या घोषणेने साऱ्यांच्या भुवया उंचावतात. अहिल्यादेवी घोषित करतात की, किर्लोस्कर कंपनीची नवी ब्रँड अँबेसेडर आहे अनुष्का. त्याचवेळी आदित्य तिथे येतो.
अहिल्यादेवींच्या हा निर्णय आदित्यला काही पटलेला नसतो. तो अहिल्यादेवींना काही बोलायला जाणार इतक्यात त्या त्याला थांबवतात. आता ब्रँड अँबेसेडर पदावरुन पारूचा मान आदित्य तिला परत मिळवून देईल का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.