Ravi Jadhav New Home : अगदी सर्वसामान्यांपासून ते दिग्गज व्यक्तीपर्यंत प्रत्येकाचं घर घेण्याचं स्वप्न असतं. हे स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण झटत असतो. सिनेसृष्टीत बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी त्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अनेकांनी स्वतःच हक्काचं घर घेतलं असल्याची पोस्ट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह शेअर केली आहे. या कलाकार मंडळींच्या यादीत आता आणखी एका कलाकाराचं नाव समोर आलं आहे. दिग्दर्शक, अभिनेता रवी जाधव यांनी नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे.
“डोंबिवली बाहेरील दावडी गावातील छोट्याशा घरातून सुरु झालेला आमचा दोघांच्या स्वप्नांचा प्रवास आता इथवर येऊन पुन्हा नव्याने नवी स्वप्ने पहायला सज्ज झाला आहे. आमच्या नव्या घराच्या वास्तूशांतीचे हे काही खास क्षण. आपले प्रेम व आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या ही विनंती”, असं कॅप्शन देत रवी जाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – Video : “शिवा आज खऱ्या अर्थानं जिंकली…”, अंध चाहतीच्या भेटीने पूर्वा कौशिक भावुक, गाणंही गायलं अन्…
रवी जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घराच्या वास्तुशांतीचे काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. व्हिडीओची सुरुवातच दगडी नंदीने होत आहे. त्यानंतर रवी जाधव व त्यांची पत्नी मेघना जाधव वास्तुशांतीच्या पूजेला हॉलमध्ये पारंपरिक अंदाजात तयार होऊन बसलेले दिसत आहेत. यावेळी दोघांचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. अवाढव्य हॉल, त्यात सुंदर असा सोफा, आणि लक्षवेधी उशीची कव्हर तसेच हॉलमधील बक्षीरूपी स्वरुपात मिळालेल्या ट्रॉफी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 18 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, ग्रँड फिनालेची तारीख जाहीर, कोण होणार विजेता?
व्हिडीओमध्ये रवी जाधव व त्यांच्या पत्नी यांनी एकत्र गृहप्रवेश केलेला पाहायला मिळत आहे. शिवाय पत्नीच्या हस्ते त्यांनी वास्तूची पूजा केली असल्याचं दिसत आहे. यावेळी त्याचे कुटुंबही एकत्रित आलेले पाहायला मिळाले. रवी जाधव यांनी नवं घर घेतला असल्याचं समोर येताच अनेक कलाकार मंडळींनी यावर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.