बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत खूप चर्चेत आहे. सध्या तिचा बहूचर्चित चित्रपट ‘इमर्जन्सी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज म्हणजे सोमवारी या चित्रपटाचा नवीन ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजपासून ठीक १० दिवसांनी प्रदर्शित होणा-या कंगनाच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हा चित्रपट १३ कटसह १७ जानेवारीपासून थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. १ मिनिट ५० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये कंगना रनौतने तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. कंगना आणि तिच्या चित्रपटाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. या चित्रपटासाठी त्याला पाचवा राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असल्याचेही लोकांनी म्हटले आहे. (kangana ranaut makeover)
नवीन ट्रेलर समोर आल्यानंतर अनुपम खेर यांनी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कंगना प्रोस्थेटिक मेकअप करताना दिसत आहे. कंगनाने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. यासाठी त्यांच्यासारखे दिसणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे हा मेकअप करताना सगळ्यांचेच कष्ट दिसून येत आहेत. हा व्हिडीओ अनुपम यांनी स्वतः शेअर केला आहे.
अनुपम यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “अप्रतिम. कंगना रणौत भारतीय इतिहासातील सर्वात शक्तीशाली महिला इंदिरा गांधी यांच्या रुपात दिसत आहे. प्रोस्थेटिक व मेकअपसाठी अकॅडमी पुरस्कार विजेते डीजे मालिनोवस्की यांचं काम तुम्ही बघू शकता. याचे याआधीही खूप कौतुक झाले आहे”.
पुढे अनुपम यांनी लिहिले की, “कंगनाच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सगळ्यात चांगल्या काळात घेऊन जाणार आहे”. अनुपम यांच्या या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात कंगना रनौत, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक, मिलिंद सोमण, महिमा चौधरी यांसारखे दिग्गज कलाकार देशातील राजकीय नेत्यांच्या भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः कंगना रनौतने केले आहे. हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. ‘मणिकर्णिका’ वगळता कंगना रनौतचे गेल्या नऊ वर्षातील सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. अशा परिस्थितीत कंगना आणि तिच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.