सध्या ‘सोनी टीव्ही’वरील ‘सेलिब्रिटीज् मास्टरशेफ’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे. गेले अनेक दिवस या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो समोर येत आहेत. अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरु आहे. यातील आता एक भाग बघायला मिळाला आहे. नुकत्याच एका प्रोमोमध्ये अभिनेत्री दीपिका कक्कर दिसून येत आहे. यामध्ये ती जेवणदेखील बनवताना दिसत आहे. यावेळी दीपिकाने एक पदार्थ तयार केला आहे. तिने बनवलेला पदार्थ चाखून शेफ विकास खन्ना यांची प्रतिक्रिया बघायला मिळत आहे. या प्रतिक्रियेनंतर दीपिका रडू लागली. त्यानंतर शोमध्ये असणाऱ्या इतर महिलादेखील रडू लागल्या. मात्र या सगळ्यानंतर नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल केले आहे. (dipika kakar getting trolled)
दरम्यान समोर आलेल्या प्रोमोमध्ये दीपिका एक डिश बनवताना दिसत आहे. तेव्हा तिच्या इथे रणवीर ब्रार व विकास खन्ना येतात आणि ती मागे राहिल्याचे सांगतात. दीपिकाकडे दुसरा प्लॅन आहे का? असंही विचारतात. त्यावर दीपिका म्हणते की, “होईल अशी आशा आहे”. नंतर ती प्लेटिंग करते आणि क्रीम ब्रुली टार्ट परीक्षकांसमोर ठेवते. नंतर परीक्षक तिने बनवलेला पदार्थ चाखतात आणि विकास तिला बघून म्हणतो, “बस्स झालं”. हे ऐकून दीपिका रडू लागते. त्यानंतर फराह तिला रडण्याचे कारण विचारते. त्यावर दीपिका म्हणते की, “मी आज त्या महिलेचं प्रतिनिधीत्व करत आहे जीला ती फक्त किचनमध्ये काम करते असं म्हणून दाबले जाते. हो आहे मी घरी जेवण बनवणारी बाई”.
दीपिकाच्या या प्रसंगानंतर अर्चना गौतम,कविता, उषा नाडकर्णी यांच्यासहित सगळ्याच महिला रडू लागतात. नंतर फराह म्हणते की, “तुला जे ट्रोल करत आहेत त्यांना उत्तर मिळालं आहे”. दीपिकाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र तिच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहीले की, “ज्या महिलेच्या घरात कुटुंबाच्या सदस्यांपेक्षा अधिक मदत करणारी लोकं आहेत आणि ती म्हणतात मी होम कुक आहे. किती मस्त जोक केला आहे. ही फक्त रडून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मास्टर शेफची ट्रॉफी पण घेऊन जाईल”.
तसेच अजून एकाने लिहिले की, “इथे पण नाटकं. आता ‘सोनी वाहिनी’ला मालिका बनवणार आहे ही”. अजून एकाने लिहिले की, “हे ससुराल सिमर का नाही. ओव्हरॲक्टिंग करणं बंद करा”. दरम्यान हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.