सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नवीन चेहरे समोर आले आहेत. अभिनयाच्या जोरावर अनेकांना प्रसिद्धीही मिळाली आहे. त्यातील एक नाव म्हणजे ‘ऑरी’. ऑरी हा त्याच्या विशिष्ट पोजमुळे अधिक चर्चेत आला. तो बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांच्या पार्टीमध्ये दिसून येतो. तसेच ईशा अंबानीचा खास मित्र असल्याचेही सांगितले जाते. तो नुकताच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये दिसला होता. तेव्हाही तो अनेक कलाकारांबरोबर पोज देतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. (Orry selfie charges)
ऑरीने आजपर्यंत अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्यामध्ये स्वतःच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. मोठ्या कलाकारांबरोबर सेल्फी घेण्यासाठी तो त्यांच्याकडून लाखो रुपये घेत असल्याचा खुलासा त्याने एकदा केला होता. त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या.
एकदा ऑरी सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमध्ये आपल्या सेल्फीची किंमत सांगितली होती. तो म्हणाला की, “माझ्या विशिष्ट पोजसाठी तो कलाकारांकडून २५ ते ३० लाख रुपये घेतो”. त्यावर सलमान म्हणाला की, “तुम्ही दिवसातून किती वेळा कार्ड स्वाईप करतोस?”, त्यावर ऑरी म्हणाला की, “मला कधीही कार्ड स्वाईप करण्याची गरज पडत नाही. मला असं वाटत की मी रात्रंदिवस कार्ड स्वाईप करावे. पण मला कलाकार पैसे देऊ देत नाहीत”.
पुढे तो म्हणाला की, “मी एक स्टार आहे त्यामुळे मला ते बिल भरु देत नाहीत. त्याबदल्यात मी त्यांना एक सेल्फी देतो. पण मग मी सेल्फीसाठी त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेत नाही”.
ऑरीचे खरं नाव ओरहान अवात्रामणि आहे. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक,इन्स्टाग्राम या माध्यमांवर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ऑरी हा ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या चेअरपर्सन ऑफिसमध्ये स्पेशल प्रोजेक्ट मॅनेजर आहे. या ठिकाणी इंटरनॅशनल क्लायंटबरोबर काम करतात. याव्यतिरिक्त तो फॅशनच्या बाबतीतही ट्रेंडमध्ये असतो. त्याच्या अतरंगी मोबाईल कव्हर्सची चर्चाही अधिक होत असते.