रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुग्णालयामधून घरी आले अमिताभ बच्चन, पण हृदयाची अँजिओप्लास्टी झालीच नाही, शस्त्रक्रिया करण्यात आली पण…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 15, 2024 | 6:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amitabh bachchan health update

रुग्णालयामधून घरी आले अमिताभ बच्चन, पण हृदयाची अँजिओप्लास्टी झालीच नाही, शस्त्रक्रिया करण्यात आली पण…

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपटांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना एक विशेष ओळख प्राप्त झाली. सध्या ते ८१ वर्षांचे असून त्यांचा फिटनेस वाखाण्याजोगा आहे. पण नुकतीच यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याच्या बातम्या समोर आल्या. या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावेत अशा प्रार्थनाही केल्या आहेत. (Amitabh bachchan health update)

आता त्यांच्या तब्येतीबद्दल एक अपडेट समोर येत आहे. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच त्यांची तब्येतही स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी सकाळी त्यांना कोकिलाबेन रुग्णालायत दाखल केल्याचे वृत्त समोर आले होते. तेथेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेची माहिती समोर आल्यानंतर सगळे जण घाबरले पण शस्त्रक्रिया त्यांच्या हृदयावर झाली नसून पायामध्ये क्लॉट असल्याने पायाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा- धक्कादायक! लेकीला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीलाच कर्करोग असल्याचं सांगितलं, अशी झाली आहे अवस्था

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

त्यांच्या जवळच्या व्यक्तीने एका माध्यमाला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, “अमिताभ यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली आणि आता त्यांना घरीदेखील आणण्यात आले आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणाही होत आहे”. अमिताभ यांनी काही तासांपूर्वी ‘कृतज्ञतापूर्वक कभी…’ असे ट्विट केले होते. यावर अनेक नेटकाऱ्यांनी त्यावर काळजी दाखवत प्रतिक्रियाही केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की, “तुम्ही व्यवस्थित रहाल अशी मी प्रार्थना करतो”, दुसरा नेटकरी लिहितो की, “तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा!”.  

आणखी वाचा – समांथा रुथ प्रभुच्या पॉडकास्टमध्ये आरोग्याविषयी चुकीची माहिती, डॉक्टरांनीच दाखवला आरसा, म्हणाले, “अशिक्षित लोकांना बोलावून…”

अमिताभ यांच्या अचानक समोर आलेल्या वृताने मनोरंजन क्षेत्रातून चिंता व्यक्त केली गेली आहे. ते लवकरात लवकर बरे होऊन त्यांनी काम सुरू करावे असेही अनेकांनी म्हंटले आहे. काही दिवसांपूर्वी ते अनंत अंबानी व राधिक मर्चंट त्यांच्या प्री-वेडिंगमध्ये कुटुंबासमवेत दिसून आले होते. आता ते कल्की २८९८ –AD या चित्रपटात दिसणार असून चाहते त्यांच्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.

Tags: Amitabh bachachnAmitabh Bachchan 81st Birthdayamitabh bachchan angioplastyamitabh bachchan health
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Vanita Kharat And Sumit Londhe

Video : ऑस्ट्रेलियावरुन येताच विमानतळावर वनिता खरातच्या स्वागतासाठी नवरा हजर, घरी बायकोसाठी मासेही बनवले अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.