शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हिना खानला ‘हा’ गंभीर आजार, रमजानमध्ये रोजा ठेवताही येईना, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “माझ्या आईने मला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 15, 2024 | 5:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hina Khan On Roza

हिना खानला 'हा' गंभीर आजार, रमजानमध्ये रोजा ठेवताही येईना, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, "माझ्या आईने मला..."

‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील हिना खान ही अक्षराच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. या मालिकेतील भूमिकेने हिनाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावरही हिना बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच सोशल मीडियावरुन पोस्ट केलेल्या अभिनेत्रीच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने तिच्या तब्येतीबाबतची चिंता सोशल मीडियावर शेअर केली आहे. रमझानच्या पवित्र महिन्यात उपवास करणाऱ्या हिनाने हातात खजूर धरत केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. (Hina Khan On Roza)

हिनाने पोस्टद्वारे असं सांगितलं की, तिला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GRAD) आहे, जो त्यांना रमझान दरम्यान होतो. या चिंतेवर मात करण्यासाठी तिने तिच्या मित्रपरिवाराला सल्ला देण्यास सांगितला आहे. हिना खानने स्वत:च्या हाताच्या तळहातावर खजूर धरलेले एक छायाचित्र पोस्ट केले आहे आणि तिच्या चाहत्यांना सांगितले की ती जीईआरडी या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. हा फोटो शेअर करताना हिना खानने तिच्या चाहत्यांना या आजारावर मात करण्यासाठी घरगुती उपाय सुचवण्याची विनंती केली आहे.

आणखी वाचा – समीर चौघुलेंच्या चाहत्याने केलेलं ‘ते’ कृत्य पाहून अभिनेताही भारावला, फोटोही केला शेअर, म्हणाले, “अशा वेळी काय बोलावं…”

View this post on Instagram

A post shared by ???????????????? ???????????????? (@realhinakhan)

फोटोच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “मला गंभीर गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD) आहे आणि दुर्दैवाने मी उपवास केल्यास रमजानमध्ये तो आणखी तीव्र होतो. आई म्हणते याला अजवा म्हणजेच खजूर मदत करु शकत. तुम्ही यावर काही घरगुती उपाय सुचवू शकता का? कृपया मला कमेंट करा वा मला मॅसेज करुन सांगा.

आणखी वाचा – “खूपच जास्त वाईट…”, ‘आई कुठे…’मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच आशुतोषने दिलं उत्तर, म्हणाला, “माझ्याविषयी प्रेक्षकांच्या मनात…”

हिनाने तिच्या सोशल मीडिया स्टोरीमध्ये तिच्या आईने सुचवलेला सल्ला शेअर केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “मम्मा म्हणाली की, काहीही खाण्यापूर्वी रिकाम्या पोटी एक खजूर खा त्यामुळे ॲसिडिटी होणार नाही”. अभिनेत्रीने तिच्या मित्र परिवाराला व चाहत्यांनाही सल्ला देण्यास सांगितला आहे. पोस्ट शेअर करत ती म्हणाली, “मला घाई नाही पण माझ्या मॅसेज बॉक्समध्ये सर्व काही पाहणे मला शक्य नाही. तुम्ही सर्व माझ्यावर खूप प्रेम करता. मी याबद्दल पोस्ट किंवा ट्विट करेन”.

Tags: entertainmenthina khanhina khan healthhina khan on rozatv actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Amitabh bachchan health update

रुग्णालयामधून घरी आले अमिताभ बच्चन, पण हृदयाची अँजिओप्लास्टी झालीच नाही, शस्त्रक्रिया करण्यात आली पण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.