एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याची उत्तम उदाहरण कलाविश्वात आपण पाहतोच. अशातच सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेते महेश कोठारे यांच्या मागे त्यांची पत्नी नीलिमा आजही ठामपणे उभी आहे. बरेचदा आपण नीलिमा यांचं कौतुक महेश यांच्या तोंडून होताना ऐकलंय. नीलिमा यांनी कौटुंबिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही ठिकाणी महेश यांना साथ दिली. चित्रपटात अभिनेत्रीची निवड करण्याइतपत त्यांनी आपलं मत महेश यांना सांगितलं. याबाबतचा एक किस्सा महेश कोठारे यांनी त्यांच्या ‘डॅम इट आणि बरंच काही’ या पुस्तकात सांगितला आहे. चला तर नेमका काय आहे तो किस्सा जाणून घेऊया आजच्या जपलं ते आपलं या भागात.(Mahesh Kothare shares Incident)
‘धुमधडाका’मधील नायिकेसाठी बरेच पर्याय असल्यामुळे कोणाची निवड करावी असा विचार महेश कोठारे करीत होते. त्यावेळचा एक किस्सा सांगत महेश यांनी लिहिलंय, हाजी अलीच्या ‘एनएससीआय’ क्लबमधून मी आणि नीलिमा गाडीनं प्रभादेवीला परत येत होतो. आमची गाडी सिग्रलजवळ थांबली आणि त्याच वेळी माझं रस्त्यावरून चालणाऱ्या एका तरुणीकडे लक्ष गेलं. ती नेमकी होती निवेदिता! तिचंही त्याच वेळी माझ्याकडे लक्ष गेलं.
पाहा महेश यांनी कोणत्या चित्रपटासाठी दिली निवेदिता यांना संधी (Mahesh Kothare shares Incident)
माझ्या आधीच्या चित्रपटात निवेदितानं सोज्वळ भूमिका साकारली असली तरी आता ती एकदम मॉडर्न ड्रेसमध्ये होती. सिग्रल सुटेपर्यंत आमचं अगदी मोजकंच बोलणं झालं. त्यानंतर आमची गाडी निघाली. मी गाडी चालवीत असतानाच नीलिमा मला म्हणाली, ‘महेश, तू याच मुलीला फायनल कर’ निवेदिताचा मॉडर्न लुक मला आणि नीलिमाला ‘धुमधडाका’ मधल्या नायिकेच्या भूमिकेशी मिळताजुळता वाटला. मी लगेचच निवेदिताला आमच्या घरी भेटायला बोलावलं आणि तिला ‘साइन’ केलं. (Mahesh Kothare shares Incident)
हे देखील वाचा – ‘मला तो किळसवाणा वाटतो’ डिंपल यांनी नानांबद्दल केलं भाष्य
मात्र निवेदिता यांची निवड अण्णासाहेबांना मान्य नव्हती. जेव्हा महेश कोठारे यांनी नीलिमा यांना येऊन अण्णासाहेबांच म्हणणं सांगितलं तेव्हा नीलिमा महेश यांना म्हणाल्या, आता कोणीतरी सांगतंय म्हणून तू तिची निवड रद्द करू नकोस. निवेदिता चांगली मुलगी आहे, तिला तू बदलू नकोस!”. अशाप्रकारे नीलिमा यांच्या सांगण्यावरून निवेदिता यांची धुमधडाका चित्रपटासाठी निवड करण्यात आली.
