नारळासारखा आतून गोड आणि बाहेरून कडक असणारे नाना पाटेकर हे एक अजब रसायन आहेत. रांगडं व्यक्तिमत्व, रफ टफ वागणं बोलणं हे नानांचं व्यक्तिमत्व. नानांच्या व्यक्तिमत्वावर त्यांची सहकलाकार डिंपल कपाडिया हिने केलेलं भाष्य आश्चर्यचकित करणार आहे. नानांनी मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही बरंच काम केलं आहे. डिंपल कपाडिया यांच्यासोबत नानांनी बरेच सिनेमे केले. ‘प्रहार: द फायनल अॅटॅक’ या लोकप्रिय चित्रपटात एकत्र काम केलं होतं. नंतर त्यांनी ‘अंगार’ आणि ‘क्रांतिवीर’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होत.(Nana Patekar Dimple Kapadia)
पाहा डिंपल यांनी सांगितली नानांची काळी बाजू (Nana Patekar Dimple Kapadia)
एका मुलाखतीत डिंपल यांना नानांसोबत काम करण्याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी सगळ्यांसमोर त्याच उत्तर देण्यास नकार दिला होता. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत डिंपल यांना नाना पाटेकर यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करायला आवडेल का असं विचारलं, तेव्हा त्यांनी ‘मला तो किळसवाणा वाटतो’ असं म्हटलं होतं. डिंपल यांचं नानांबद्दलच हे वाक्य चकित करणार होत. त्या नंतर त्यांना चांगलं की वाईट अर्थान असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी नकारात्मक मान हलवत उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी स्पष्ट असं उत्तर देणं टाळलं.
कोड्यात बोलत डिंपल म्हणाल्या, ‘चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने. तो खूप टॅलेंटेड आहे, यात शंका नाही. तो एक अत्यंत प्रतिभावान अभिनेता आहे. जेव्हा मला त्याच्यासारखे टॅलेंटेड लोक दिसतात, तेव्हा त्यांच्या कितीही मी चुका माफ करू शकते. मी त्याच्या अभिनयावर इतकी फिदा आहे की त्यासाठी माझे प्राणही मी देऊ शकते. (Nana Patekar Dimple Kapadia)
हे देखील वाचा – “खबरदार पुन्हा असं काही बोलशील तर!” महेश कोठारेंना दिली पत्नीने धमकी
एक व्यक्ती म्हणून माझ्यासोबत तो खूप छान व चांगला वागतो, आम्ही चांगले मित्र आहोत. पण मी त्याची नकारात्मक बाजूही पाहिली आहे. ‘काळी बाजू. आपल्या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वात अशीच एक नकारात्मक बाजू असते, ती आपण लवपून ठेवतो आणि वरवर चांगलं दाखवतो. तशीच नकारात्मक बाजू त्यानेही लपवून ठेवली आहे.'(Nana Patekar Dimple Kapadia)
नाना पाटेकर यांच्या वाईट बाजूबद्दल डिंपल यांनी भाष्य जरी केलं असलं तरी नानांच्या अभिनयाला आणखी कुणी पर्याय असूच शकत नाही हे देखील त्यांनी मान्य केल.