सिनेसृष्टीतल्या बऱ्याच कलाकार मंडळींनी एकमेकांसोबत लगीनगाठ बांधली. सुप्रिया पिळगावकर – सचिन पिळगावकर, प्रसाद ओक मंजिरी ओक आणि सर्वांचे लाडके अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. बरं पण अशोक मामांनी निवेदिता यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय थोडा उशिराच घेतला. दरम्यान पुढाकार मात्र निवेदिता यांनीच घेतला. (Nivedita Saraf shares Incidence)
अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या नात्यातही चढ उतार हे आलेच, आणि प्रत्येक लग्नात हे चढ उतार असतातच. स्वभाव, विचारसरणी यांत असलेल्या फरकामुळे असे प्रसंग येन स्वाभाविकच आहे. याबाबतचा एक किस्सा निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्या मी बहुरूपी या आत्मचरित्रात सांगितला आहे. चला तर जाणून घेऊया आजच्या जपलं ते आपलं या भागात काय आहे तो किस्सा.
पाहा कस टिकवलं निवेदिता यांनी त्यांचं लग्न (Nivedita Saraf shares Incidence)
निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांच्या लग्नाला तेहतीस वर्षं झाली आहेत. निवेदिता यांनी म्हटलंय की, हे लग्न टिकणार नाही असं त्यावेळी अनेकांना वाटलं होतं. आणि अनेकांनी निवेदिता यांना तसं बोलूनही दाखवलं होतं. यावर निवेदिता पुढे म्हणाल्या, लग्न करायचं तर ते टिकवण्यासाठीच असं मी पक्कं ठरवलं होतं. त्यासाठी लागतील ते आणि तेवढे प्रयत्न करण्याची माझी तयारी होती. कारण कोणतंही लग्न आपोआप टिकत नाही, त्यासाठी मेहनत करावीच लागते, तशी मी केलीये, असं मला वाटतं असं निवेदिता म्हणाल्या. (Nivedita Saraf shares Incidence)
यापुढे निवेदिता यांनी म्हटलंय की, त्यासाठी प्रसंगी माझ्या करिअरशी तडजोड केलीये. स्वतःला बदललंय. अर्थात हे मी एकटीनंच केलंय असं नाही. अशोकनंही त्याच्या बाजूनं तेच केलंय. या नात्याशी शंभर टक्के बांधिलकी मानणारा नवरा मला मिळाला म्हणून मी स्वतःला अतिशय नशीबवान मानते. माझं सुखाचं आणि समाधानाचं पारडं खूप जास्त जड आहे.
हे देखील वाचा – शॉपिंगदरम्यान निवेदिता यांना मिळाली गैरवागणूक पोस्ट करत भडकल्या निवेदिता
अशाप्रकारे ‘हे लग्न टिकणार नाही’ असं सांगणाऱ्या प्रत्येकाचे हे वाक्य खोडून काढत निवेदिता यांनी त्यांना योग्य पद्धतीने उत्तर दिलं.