दिवाळीनिमित्त कलाकार मंडळी दिवाळी साजरी करतानाचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून पोस्ट करताना दिसत आहेत. अनेक कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचे तसेच मित्रपरिवाराबरोबरचे अनेक फोटोस शेअर करत असतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही दिवाळी पाडव्यानिमित्त शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळी पाडव्याचं औचित्य साधत अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पतीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. (Hemangi Kavi On Husband)
मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने पाडव्यानिमित्त शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाडव्याचं औचित्य साधत हेमांगीने पतीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तिचा मॉडर्न पारंपरिक लुक पाहणं रंजक ठरतंय. या फोटोंमध्ये हेमांगीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे आणि याचं कारण ही खास आहे. कारण हेमांगीला दिवाळी पाडव्यानिमित्त एक खास भेटवस्तू मिळाली आहे. याबाबतची पोस्ट शेअर करत तिने हा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे.
हेमांगीने दिवाळी पाडव्यानिमित्त पतीबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. आणि त्याखाली कॅप्शन देत तिने म्हटलं आहे की, “पाडव्यानिमित्त आमच्या माणसाने दिली साडी पिवळी धम्म, दरवेळेच्या गजऱ्याहून झाली माझी बढती, मी म्हटलं हम्म!”. हेमांगीला पाडव्याचं गिफ्ट म्हणून तिच्या नवऱ्याने साडी दिली असल्याचं तिच्या या पोस्टवरून कळतंय. इतकंच नव्हे तर तिने गिफ्ट म्हणून दिलेली साडी नेसून फोटोही पोस्ट केले आहेत.
आजवर हेमांगी तिच्या प्रत्येक पोस्टमुळे चर्चेत असते. तिच्या बेधडक स्वभावामुळे तसेच बिनधास्त व्यक्तिमत्वामुळे हेमांगी कवीला ओळखाल जातं. प्रत्येक माध्यमांत हेमांगीने निवडक भूमिका स्वीकारून अभिनयाची छाप उमटवली. केवळ उत्तम अभिनेत्री म्हणून तिची ओळख नाही, तर उत्तम नृत्यांगणा व विनोदी कलाकार म्हणून तिला प्रेक्षक ओळखतात. त्याचबरोबर ती अनेक जाहिरातींमध्ये देखील झळकलेली आहे.