गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिवाळी पाडव्यानिमित्त हेमांगी कवीला नवऱ्याकडून मिळाली खास भेटवस्तू, फोटो पोस्ट करत म्हणाली, “आमच्या माणसाने…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 15, 2023 | 9:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hemangi Kavi On Husband

दिवाळी पाडव्यानिमित्त हेमांगी कवीला नवऱ्याकडून मिळाली खास भेटवस्तू, फोटो पोस्ट करत म्हणाली, "आमच्या माणसाने…"

दिवाळीनिमित्त कलाकार मंडळी दिवाळी साजरी करतानाचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून पोस्ट करताना दिसत आहेत. अनेक कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचे तसेच मित्रपरिवाराबरोबरचे अनेक फोटोस शेअर करत असतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही दिवाळी पाडव्यानिमित्त शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळी पाडव्याचं औचित्य साधत अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पतीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. (Hemangi Kavi On Husband)

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने पाडव्यानिमित्त शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाडव्याचं औचित्य साधत हेमांगीने पतीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तिचा मॉडर्न पारंपरिक लुक पाहणं रंजक ठरतंय. या फोटोंमध्ये हेमांगीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे आणि याचं कारण ही खास आहे. कारण हेमांगीला दिवाळी पाडव्यानिमित्त एक खास भेटवस्तू मिळाली आहे. याबाबतची पोस्ट शेअर करत तिने हा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे.

आणखी वाचा – “भाषेवरुन हिणावलं…”, मराठी नव्हे तर मारवाडी आहे जितेंद्र जोशी, अभिनेत्याचे मोठे भाष्य; म्हणाला, “महाराष्ट्रात जन्माला आलेला…”

हेमांगीने दिवाळी पाडव्यानिमित्त पतीबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. आणि त्याखाली कॅप्शन देत तिने म्हटलं आहे की, “पाडव्यानिमित्त आमच्या माणसाने दिली साडी पिवळी धम्म, दरवेळेच्या गजऱ्याहून झाली माझी बढती, मी म्हटलं हम्म!”. हेमांगीला पाडव्याचं गिफ्ट म्हणून तिच्या नवऱ्याने साडी दिली असल्याचं तिच्या या पोस्टवरून कळतंय. इतकंच नव्हे तर तिने गिफ्ट म्हणून दिलेली साडी नेसून फोटोही पोस्ट केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

आणखी वाचा – “मर्सिडीज घ्यायची ना”, मिताली मयेकरने नवी कार घेतल्यानंतर नेटकऱ्याने सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, ” माझा बजेट तेवढा…”

आजवर हेमांगी तिच्या प्रत्येक पोस्टमुळे चर्चेत असते. तिच्या बेधडक स्वभावामुळे तसेच बिनधास्त व्यक्तिमत्वामुळे हेमांगी कवीला ओळखाल जातं. प्रत्येक माध्यमांत हेमांगीने निवडक भूमिका स्वीकारून अभिनयाची छाप उमटवली. केवळ उत्तम अभिनेत्री म्हणून तिची ओळख नाही, तर उत्तम नृत्यांगणा व विनोदी कलाकार म्हणून तिला प्रेक्षक ओळखतात. त्याचबरोबर ती अनेक जाहिरातींमध्ये देखील झळकलेली आहे.

Tags: entertainmenthemangi kavimarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Sachin Pilgaonkar shares a childhood photo

निरागस चेहरा, आगळीवेगळी हेअरस्टाईल अन्…; 'या' फोटोतील चिमुकल्याला ओळखलं का? आज आहे मराठीतील दिग्गज अभिनेता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.