शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिंमत असेल तर…”, ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या, “तुमचा चेहरा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 29, 2024 | 11:12 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jaya bachchan on Trollers

"हिंमत असेल तर...", ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या, "तुमचा चेहरा…"

सडेतोड व बिनधास्त वक्तव्यांमुळे ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच चर्चेत असतात. त्या कोणत्याही विषयावर आपले मत परखडपणे मांडत असतात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा त्यांना नेटकऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. यामुळे सोशल मीडियावर देखील त्यांच्याबद्दलच्या अनेक पोस्ट व मीम्स व्हायरल होत असतात. नुकतेच जया बच्चन यांनी एका पॉडकास्टमध्ये भाष्य केले असून नेटकऱ्यांना त्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. (Jaya bachchan on Trollers)

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाच्या ‘व्हॉट द हेल’ या पॉडकास्टमध्ये नव्याची आजी जया व आई श्वेता नंदा सहभागी झाल्या होत्या. या शोमध्ये अनेक विषयांवर चर्चा सुरु होत्या. त्यावेळी सोशल मीडियावर ट्रोल होण्याबाबत श्वेताने जयाजींना प्रश्न केला. तिने विचारले की, “सोशल मीडियावर खूप विचित्र पद्धतीने लिहिले जाते. सर्वात जास्त व्ह्युज व कमेंट्सही त्यावरच येतात त्यावर तुमचं काय म्हणणे आहे?”, त्यावर जया यांनी उत्तर दिले की, “त्यांची हिंमत असेल तर समोर येऊन बोलून दाखवावे”.

आणखी वाचा – दीपिका पदुकोण आई होणार, ‘या’ महिन्यात बाळाला देणार जन्म, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

पुढे त्या म्हणाल्या की, “जर तुम्हाला कमेंट करायची असेल तर निदान सकारात्मक कमेंट करा. पण तुम्हाला तर तुमचा निर्णय ऐकवायचा असतो”. हे ऐकून नव्या त्यांना म्हणाली की, “जर त्या लोकांना तुमच्या समोर बसवलं तर बोलू शकतील का?”, त्यावर जया म्हणाल्या की, “त्यांची हिंमत तरी होईल का समोर बसून बोलण्याची”, हे ऐकून नव्या हसून म्हणाली की, “नाही. तुमच्यासमोर तरी बोलायची हिंमत होणार नाही”.

आणखी वाचा – “आमच्या १२ वर्षांच्या मुलाला…”, आमिर खानबरोबर घटस्फोट घेण्यावरुन पुन्हा एकदा किरण रावचे भाष्य, म्हणाली, “समाजाच्या नजरेमध्ये…”

तसेच जया यांनी ट्रोलर्सला उत्तर करत म्हटलं की, “हिम्मत असेल तर खऱ्या गोष्टींवर बोलून दाखवा आणि तुमचा चेहराही समोर येऊ दे”, असे म्हणून त्यांनी आपला ट्रॉलर्सप्रती असलेला राग व्यक्त केला आहे. जया यांच्या या प्रतिक्रियांवर मुलगी श्वेताही व्यक्त झाली. श्वेता म्हणाली की, “आजकाल लोक दुसऱ्यांचे दु:ख व समस्या बघूनच खुश होतात”. हे चुकीचे असल्याचंही ती म्हणाली. नव्याच्या पॉडकास्टमध्ये जया दिलखुलासपणे व्यक्त होताना दिसल्या. त्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटामध्ये शेवटच्या दिसल्या होत्या.

Tags: amitabh bachchanjaya bachchannavya naveli nandapodcastshweta nanda
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Taapsee pannu reacted on wedding rumors with boyfriend mathias boe see the details

“माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत...”, लग्नाच्या चर्चांवर तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.