शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “हा घाणेरडापणा…”, शोमध्ये डान्स करत पाठ व कंबरेवर नोरा फतेहीने ओतलं पाणी, ‘ते’ कृत्य पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “आदर गमावला अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 1, 2024 | 5:46 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Nora Fatehi is being trolled for doing a weird dance while pouring water on her body

Video : "हा घाणेरडापणा...", शोमध्ये डान्स करत पाठ व कंबरेवर नोरा फतेहीने ओतलं पाणी, 'ते' कृत्य पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, "आदर गमावला अन्..."

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेहीने तिच्या डान्सने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नोराच्या दमदार डान्स व सौंदर्याने तिने चाहत्यांना अक्षरश: भुरळ घातली आहे. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या डान्स व अभिनयामुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हायरल व्हिडीओमुळे ती ट्रोलिंगची शिकार बनली आहे.

नोरा फतेहीने नुकतीच ‘डान्स प्लस प्रो’ या रिआलिटी शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये नोराने डान्स केला. पण तिचा हा डान्स पाहताच नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. नोराचा हा डान्स बघून शोमधील परीक्षकही अवाक् झाले. या व्हिडीओमध्ये नोरानं स्वतःवर पाणी ओतून डान्स केला असल्याचे दिसत आहे. नोराच्या या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

आणखी वाचा – Video : दीपा परबने नवऱ्यासह परळमध्ये गरजूंना केलं अन्नदान, स्वामी समर्थांचं नाव घेत चांगलं काम करण्याचा चेहऱ्यावर आनंद अन्…; व्हिडीओ व्हायरल

नोराचा हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिला खडेबोल सुनावले आहेत. या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये एकाने असं म्हटलं आहे की, “हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, याचं भान असूद्या” तर दुसऱ्याने “हा डान्स आम्हाला कुटुंबाबरोबर पाहता येणार नाही.” टर आणखी एकाने “माफ करा, पण माझा तुमच्याबद्दल असलेला सर्व आदर तुम्ही आता गमावला आहे, हा कसला घाणेरडा शो आहे?” अशा अनेक नकारात्मक कमेंट्स आल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या डान्सला ‘असभ्य’ व ‘अश्लील’ म्हणूनही संबोधले आहे.

आणखी वाचा – Video : वाई-मुंबई प्रवासादरम्यान बोगद्यामध्ये तासभर अडकून राहिले आदेश बांदेकर, कंटेनरचा अपघातही झाला अन्…; म्हणाले, “अपघात, नाहक बळी…”

दरम्यान, तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तिचा ‘क्रॅक’ हा चित्रपट येणार आहे. यात ती अभिनेता विद्युत जामवालबरोबर दिसणार आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

Tags: bollywood actressBollywood DancerBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsnora fatehiनोरा फतेहीबॉलीवूड अभिनेत्रीबॉलीवूड डान्सरबॉलीवूड बातमीबॉलीवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate shared photo of eating Vadapav and Misal see the details

लग्नानंतर असं आयुष्य जगत आहेत मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, मिसळ-वड्यांवर मारला ताव, म्हणाली, "जीभेचे चोचले..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.