शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रेव्ह पार्टी, विषारी साप अन् परदेशी मुली पुरवल्याचा आरोप, ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 3, 2023 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
FIR Against Elvish Yadav

रेव्ह पार्टी, विषारी साप अन् परदेशी मुली पुरवल्याचा आरोप, 'बिग बॉस' विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

नोएडा पोलिसांनी प्रसिद्ध यूट्यूबर आणि ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचं समोर आलं आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून एल्विश यादव फरार आहे. पोलिस एफआयआरनुसार, एल्विश यादव नोएडामध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित करत असे. तसेच पार्टीत बंदी असलेले साप आणि परदेशी मुलींनाही प्रवेश मिळाल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी एल्विशच्या टोळीतील ५ जणांना अटक केली आहे. (FIR Against Elvish Yadav)

नोएडा पोलिसांच्या एफआयआरनुसार, एल्विश यादवच्या रेव्ह पार्टीमध्ये परदेशी मुलींनाही आमंत्रित करण्यात आले होते. या प्रकरणात एल्विश यादव सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून नऊ विषारी साप जप्त करण्यात आले असणं या प्रकरणी एल्विश यादव यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस एल्विश यादवला अटक करण्याच्या मार्गावर आहेत. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस स्टेशनमधील हे प्रकरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी फिर्यादीच्या (पीएफए-अ‍ॅनिमल वेल्फेअर ऑफिसर) तक्रारीच्या आधारे, पोलिस स्टेशन सेक्टर-४९ ने नोएडा सेक्टरमध्ये असलेल्या बँक्वेट हॉलमध्ये पार्टी केल्याप्रकरणी एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी नऊ साप आढळून आले. आता या प्रकरणाचा पुढील तपास व कारवाई सुरू आहे.

आणखी वाचा – “वाईट निर्णय आणि…”, अंकिता लोखंडे नवऱ्यासह ‘बिग बॉस’मध्ये गेल्यामुळे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नाराज, म्हणाला, “तू मला चुकीचं…”

नोएडा पोलिसांच्या एफआयआरनुसार, पीएफए ​​ऑर्गनायझेशनचे प्राणी कल्याण अधिकारी गौरव गुप्ता यांनी सांगितले की, एल्विश यादव फार्म हाऊसमध्ये त्याच्या टोळीतील इतर सदस्यांसह सापाचे विष आणि जिवंत सापांसह व्हिडिओ शूट करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. तसेच बेकायदेशीरपणे रेव्ह पार्ट्यांचं आयोजनही तो करत असे. यानंतर पीएफए ​​ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्याने एका माहितीच्या मदतीने एल्विश यादव यांच्याशी संपर्क साधला आणि त्याला रेव्ह पार्टी आयोजित करण्यास सांगितले, त्यानंतर एल्विशने त्याच्या एका एजंटचा नंबर दिला आणि त्याचे नाव सांगून त्याच्याशी बोलण्यास सांगितले.

आणखी वाचा – “४० दिवसांचा अवघड, खडतर प्रवास…”, ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होताच प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “कष्टाचं कौतुक…”

यानंतर, संघटनेला अडकवण्यासाठी, संघटनेने एल्विशच्या एजंट्ससह एक रेव्ह पार्टी आयोजित केली, जिथे एजंट त्यांच्या साथीदारांसह नोएडा सेक्टर ५१ मधील बँक्वेट हॉलमध्ये पोहोचले. येथे त्यांना नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने पकडले. आरोपींकडून बाटलीतील नऊ विषारी साप आणि २० मिली सापाचे विषही जप्त करण्यात आले आहे.

Tags: bigg bossbigg boss ottelvish yadaventertainmentFIR Against Elvish Yadav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ranbir Kapoor Animal movie trailer update

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटाचे दोन मध्यांतर असणार, पण असं का?, यामागचं खरं कारण आलं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.