‘बिग बॉस १७’ मध्ये अंकिता लोखंडे हिने तिचा पती विकी जैन बरोबर प्रवेश केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधीपासूनच हे कपल चर्चेत असायचं. सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर तर हे कपल मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून त्यांच्यात वाद होताना पाहायला मिळाला. (Ruchira Jadhav On Ankita Lokhande)
हिंदी ‘बिग बॉस’मधील अंकिताची एंट्री पाहता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेली पोस्ट सध्या चर्चेत ठरतेय. ही अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात या अभिनेत्रीने सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच या अभिनेत्रीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात पतीबरोबर केलेला प्रवेश रुचिराला खटकलेला दिसतोय. रुचिराने अंकिताला पाठिंबा दर्शवत एक पोस्ट शेअर केली होती. रुचिराची अंकितासाठीची ही पोस्ट अधिक चर्चेत आली आहे.

रुचिराच्या मते अंकिताचा पतीबरोबर ‘बिग बॉस १७’ मध्ये सहभागी होण्याचा निर्णय चुकीचा होता. “वाईट निर्णय, अंकिता, तू मला चुकीचं सिद्ध करशील अशी मला आशा आहे आणि शेवटी तुझं सर्वकाही चांगलं होईल,” असं म्हणत रुचिराने पोस्टमध्ये अंकिताचा एक फोटो शेअर केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अंकिता व विकीमध्ये प्रचंड भांडणं होत आहेत. अशातच रुचिराची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच अंकिता व विकी यांच्यात सुरु झालेल्या वादांमुळे त्यांचे मार्ग वेगळे होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे ही या शोच्या प्रबळ स्पर्धकांपैकी एक आहे. पण पतीच्या कृत्यामुळे ती कमकुवत होताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अंकिता पतीवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. विकी घरातील इतर स्पर्धकांबरोबर अधिक व्यस्त झाल्याने अंकिता त्याच्यावर नाराज झालेली पाहायला मिळाली. सध्या ते स्वतंत्र खेळ खेळताना दिसत आहेत.