शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“४० दिवसांचा अवघड, खडतर प्रवास…”, ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होताच प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “कष्टाचं कौतुक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 3, 2023 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Oak On Mahaparinirvan

"४० दिवसांचा अवघड, खडतर प्रवास…", 'महापरिनिर्वाण' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होताच प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "कष्टाचं कौतुक…"

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा बाबासाहेबांवर आधारित नसून त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला आपल्या कॅमेरात त्या दिवसाची चित्र कैद करणाऱ्या एका व्यक्तीवर आधारित आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून त्या दिवशीची ती चित्र आपापल्या कॅमेरात टिपणारा अवलिया कलाकार नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. (Prasad Oak On Mahaparinirvan)

व्हटकर यांच्या कॅमेराच्या रीळने जे चित्रित केलं ते लवकरच मोठया पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. या चित्रपटाचं नुकतंच चित्रीकरण पूर्ण झालं असून या भव्य चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव चित्रपटात व्हटकरांची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक याने मांडली आहे. चित्रीकरदरम्यानचा एक पाठमोरा आणि नजरेला भिडणारा असा फोटो शेअर करत प्रसादने लिहिलेली ही पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – “बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्या पण…”, हॉटेल बंद झालं असल्याच्या चर्चांवर सुप्रिया पाठारेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “आई गेली आणि…”

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

प्रसादने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “महापरिनिर्वाण” आज अखेरीस ४० दिवसांचा अत्यंत अवघड, खडतर असा पण प्रचंड समाधान देणारा शूटिंगचा प्रवास संपला. माझ्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार. माझे सहकलाकार अंजली पाटील, गौरव मोरे, कुणाल मेश्राम, कमलेश सावंत, हेमल इंगळे तुमचं सेट वरचं सोबत असणं खूप मोलाचं आणि भार हलका करणारं होतं. फुलवा, तुझ्यासोबत पहिल्यांदाच काम केलं मी पण खूप मज्जा आली. नितीश नांदगावकर फार सुंदर सेट्स आणि चंद्रकांत सोनावणे सर. एखादी बाई दागिना कसा मिरवते तसे तुमचे कपडे घालून मिरवावसं वाटलं, वा. वा. माझी मेक अप टीम सलीम, प्रताप, आणि सुन्या तुम्हाला खूप प्रेम! दिग्दर्शक शैलेंद्र बागडे सर, छायाचित्रकार अमर कांबळे आणि निर्माते आशिष सर आणि सुनील सर. तुमच्या कष्टांचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. इतकं अचूक काम करणारे निर्माते, छायाचित्रकार आणि लेखक दिग्दर्शक एकत्रपणे फार कमी वेळ अनुभवायला मिळतात. हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय झाला त्याचं श्रेय संपूर्ण टीमला.”

आणखी वाचा – “घर छोटं आहे पण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने खरेदी केलं स्वतःचं घर, म्हणाला, “दहा बाय दहाचं छप्पर…”

त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत चित्रपटाची उत्सुकता व्यक्त केली आहे. त्याच्या या पोस्टवर अभिनेता सिद्धार्थ जाधवने कमेंट करत “अभिनंदन प्रसाद दा. हा सिनेमा खूप स्पेशल आहे. वाट बघतोय. आणि तुम्ही कमाल काम केलं असेल यांत शंकांचं नाही. खूप शुभेच्छा” असं म्हणत चित्रपटाबाबतची उत्सुकता व्यक्त केली आहे.

Tags: entertainmentmahaparinirvanmarathi movieprasad oak
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Urfi Javed was Arrested

Video : उर्फी जावेदला रस्त्यांवर तोकडे कपडे घालून फिरणं भोवलं?, पोलिसांनी केली अटक, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.