शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Majjacha Adda : “विनोदी नाटक असूनही कोणीच हसलं नाही अन्…”, अशोक सराफ यांनी सांगितला भन्नाट किस्सा, म्हणाले, “गुंड किंवा मोठा दादा…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 16, 2023 | 2:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
no one has laughed marathi actor ashok saraf shared memories of his old play madanachi manjiri

"विनोदी नाटक असूनही कोणीच हसलं नाही अन्…", अशोक सराफ यांनी सांगितला भन्नाट किस्सा, म्हणाले, "गुंड किंवा मोठा दादा…"

Majjacha Adda with Ashok Saraf :  मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन काणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. गेली पाच दशके त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेविश्वातही त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यामुळे त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या  कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी त्यांच्या नाटकाचा एक किस्सा सांगितला.

यावेळी त्यांना “तुमच्या एखाद्या विनोदावर कधी प्रेक्षक हसले नाहीत, असं कधी झालं आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यांचे उत्तर देताना अशोक सराफ यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला. यावेळी ते असं म्हणाले की, “नांदेडला आम्ही ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाचा प्रयोग करत होतो. तिथल्या एका कंत्राटदाराने त्या नाटकाचा प्रयोग घेतला होता. हे नाटक एकदम विनोदी होतं. नाटकाच्या पहिल्या ओळीपासून ते अगदी शेवटच्या ओळीपर्यंत नाटकात प्रत्येक ठिकाणी विनोद होता. पण तिथला एकही माणूस हसत नव्हता.”

आणखी वाचा – “हे होणार होतंच….” मराठी अभिनेत्याने सांगितला बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या भेटीचा ‘तो’ किस्सा, म्हणाले, “अचानक एकदा रात्री…”

यावर हे प्रेक्षक हसत का नाहीत असा प्रश्न अशोक सराफ यांच्यासह सर्वांनाच पडला. इतके विनोदी नाटक असूनही एकही प्रसखक त्यावर हसत नव्हता किंवा त्यांना दाद देत नव्हता. त्यामुळे सगळ्यांनाचं चिंता वाटू लागली. यावर नाटकातल्या एकाने त्यांना “हे लोक हसत का नाही आहेत? त्यांना ऐकू येत नाही की काही कळत नाही आहे?” असं विचारलं. पण हे नाटक तिथल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी ज्या कंत्राटदाराने घेतले होते, तो तिथला गुंड किंवा मोठा दादा होता. यावर त्या कंत्राटदाराने म्हटले. “ते काय हसतील? एकेकाला सांगून ठेवलं आहे. खबरदार कुणी हसलात तर” अशोक सराफ यांनी सांगितलेल्या किस्स्यावर एकच हशा पिकला.

आणखी वाचा – Majjacha Adda : “तो मला घाबरुन राहायचा कारण…”, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत भरभरुन बोलले अशोक सराफ, म्हणाले, “माझ्याबरोबर त्याने…”

दरम्यान, त्या कंत्राटदाराच्या सांगण्यावरून नाटक बघायला आलेल्या प्रेक्षकांपैकी कुणीही हसले नव्हते. त्यामुळे आपल्या प्रत्येक विनोदाने प्रेक्षकांना हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांच्या त्या विनोदी नाटकाला एकही प्रेक्षक हसला नसल्याचा प्रसंग सराफ यांच्याबरोबरही घडला आहे हे खूपच आश्चर्यचकित करणारे होते.   

Tags: Ashok Saraf in Majjacha AddaAshok Saraf latest interviewITSMAJJAItsmajja AddaItsmajja exclusive interview of ashok sarafmajjacha addaMajjacha Adda with Ashok Saraf
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Majjacha Adda with Ashok Saraf

Majjacha Adda : "विनोद लोकांपर्यंत पोहोचला नाही तर…", विनोदाच्या टायमिंगबाबत अशोक सराफांचं मोठं विधान, म्हणाले, "मोठमोठ्या कलाकारांनाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.