शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Majjacha Adda : “तो मला घाबरुन राहायचा कारण…”, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत भरभरुन बोलले अशोक सराफ, म्हणाले, “माझ्याबरोबर त्याने…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 16, 2023 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
majjacha adda ashok saraf shared memories of late actor laxmikant berde

"तो मला घाबरुन राहायचा कारण…", लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत भरभरुन बोलले अशोक सराफ, म्हणाले, "माझ्याबरोबर त्याने…"

Majjacha Adda with Ashok Saraf : मराठी चित्रपटससृष्टीमधील ८०-९० च्या दशकातला काळ हा अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चांगलाच गाजवला. या कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळीच ओळख दिली. त्यापैकी लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यामध्ये नाहीत. पण अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे हे आजही त्यांच्या आठवणीत भावुक होतात. त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी सांगतात. अशातच अशोक सराफ यांना ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात लक्ष्मीकांत यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी त्यांनी लक्ष्मीकांत यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला.

यावर उत्तर देताना अशोक सराफ यांनी असे म्हटले की, “लक्ष्मीकांत हा खूपच मेहनती व टॅलेंटेड कलाकार होता. त्याने अगदी शून्यापासून सुरुवात केली आणि त्याच्या मेहनतीच्या जोरावर तो चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीचा कलाकार झाला. कुठल्याही कलाकाराने शून्यापसून सुरुवात करत आपले वेगळे विश्व निर्माण करणे हे खुप कठीण असते. हे सगळ्यांनाच जमत नाही. पण त्याने ते करुन दाखवलं. त्याने स्वत:वर खूप मेहनत घेतली आणि त्यावर तो कुठल्याकुठे निघून गेला. आम्ही दोघांनी मिळून जवळपास ५० चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले. मी लोकप्रियतेच्या शिखरावर तो या क्षेत्रात आला. त्यामुळे मी त्याला सीनियर होतो आणि म्हणून त्याला माझ्याबद्दल एक आदरयुक्त भीती होती. त्यामुळे मला तो कायम घाबरून राहायचा.”

आणखी वाचा – “हिंदी चित्रपटांना अर्थच नाही, शोबाजी अन्…”, अशोक सराफांचा हिंदीसह मराठी चित्रपटांवरही निशाणा, म्हणाले, “दुर्देव आहे की मराठी लोकांना…”

यापुढे त्यांनी लक्ष्मीकांत यांचे कौतुक करताना असे म्हटले की, “लक्ष्मीकांत हा खूप खट्याळ व मिश्किल होता. तो बाहेर खूप धमाल मज्जा मस्ती करत असला, तरी माझ्याबरोबर असताना तो नेहमीच शांत असायचा. इतरवेळी तो काहीही करत असला तरी माझ्यासमोर तो कधीही वाकडंतिकडं बोलायचा नाही किंवा काही फालतूगिरी करायचा नाही. मला कायम घाबरून राहायचा. पण हा त्याच्या स्वभावातला चांगुलपणा होता. माझ्याविषयीच्या आदरयुक्त भीतीमुळे तो माझ्यासमोर जास्त बोलायचा नाही. तसेच त्याची आकलनशक्ती ही फार चांगली होती. तो नाचण्यात खूप चांगला होता. तो डान्समधील स्टेप्स खूप चांगल्या प्रकारे करायचा. माझ्याबरोबर त्याने कायम सहाय्यक भूमिका केल्या. पण त्यानंतर त्याने वैयक्तिक व मुख्य भूमिका असलेले अनेक चित्रपट केले आणि तो सुपरस्टार झाला.”

आणखी वाचा – “कोणत्याही नकारात्मकतेसाठी…” तिसऱ्या लग्नानंतर पियुष रानडेने बायकोबरोबर शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “तुमच्याकडे…”

दरम्यान, यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत यांचे तोंडभरून कौतुक केले. लक्ष्मीकांत यांच्या स्वभावाबद्दल सांगितले. यांसह ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात त्यांनी इतर विषयांवरदेखील मनमोकळेपणाने संवाद साधला. अनेक विषयांना त्यांच्या खास शैलीत उत्तरे देत ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात गप्पा मारल्या. त्याचबरोबर अनेक प्रश्नांवर त्यांनी त्यांची दुसरी बाजुही मांडली व अड्डा श्रवणीय केला.    

Tags: Ashok Saraf in Majjacha AddaAshok Saraf latest interviewITSMAJJAItsmajja AddaItsmajja exclusive interview of ashok sarafmajjacha addaMajjacha Adda with Ashok Saraf
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Majjacha Adda with Ashok Saraf Interview

Majjacha Adda : अशोक सराफांनी सांगितल्या ‘हम पांच’ मालिकेच्या आठवणी, म्हणाले, "फोटोतील बायकोबरोबर संभाषण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.