‘बाई वाड्यावर या’ हे वाक्य ऐकलं की आजही आपल्याला निळू फुले यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. निळू फुले हा खेळीया आयुष्याच्या आणि नाटक आणि चित्रपटाच्या रंगमंचावर दीर्घकाळ खेळत राहिला. एक कलावंत म्हणून असलेले त्याचे अस्सलपण, कार्यकर्ता म्हणून असलेले सच्चेपण, हे अनेकांनी अनुभवलं, मात्र त्याहून एक माणूस म्हणून असलेली त्यांची प्रतिमा अधिक उठावदार होती. निळे फुले राष्ट्रसेवा दल कलापथक अंतर्गत बरेच काम केलं जायचं. या कलापथकाचा प्रमुख राम रानडे याने कलापथकात काम करतानाच किस्सा एका पुस्तकात लिहून ठेवलाय.(Nilu Phule Story)
हे देखील वाचा -‘तो हात मिळवणार इतक्यात खाली कोसळला आणि दुर्घटना घडली’
आटवाटेच खेड या ठिकाणी निळू फुले यांच्यासोबत कलापथकातील इतर सदस्य एका कार्यक्रमादरम्यान गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सगळेच जण एकत्र जमले.सगळेच जण जेवणासाठी एकत्र जमलेले असतात, भात, भाकरी, वरण, चटणी असा त्यावेळी जेवणाचा बेत होता असे निळू फुले यांचे मित्र राम रानडे यांनी लिहिलंय. पुढे ते म्हणाले, आम्ही आता जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात तिथे जेवायला बसलेल्या पंक्तीतील एका माणसाकडे लक्ष गेलं. मळकट लेहेंगा, शर्ट घातलेला माणूस आमच्याबरोबर जेवणाच्या पंक्तीस बसलेला. तो आमच्याबरोबर आलेला नव्हता आणि स्थानिक कार्यकर्त्यांपैकीही नव्हता. केवळ निळूभाऊंच्या बरोबर जेवायला मिळावं म्हणून दाटून पंक्तीत घुसला होता.
पहा काय केलं होत त्यावेळी निळू भाऊंनी (Nilu Phule Story)
चल उठ उठ हो बाहेर असं एका कार्यकर्त्यानं त्याला दटावलं त्यावेळी तो माणूस शरमला. पानावरून उठू लागला. अर्थात त्याची आगळीक पकडली गेली होती. आम्ही सारे अवाक झालो, दरम्यान निळूभाऊंच्या लक्षात सर्व प्रकार आला आणि निळूभाऊ हुकमी आवाजात गुरगुरला. त्याला नका उठवू पानावरून त्याला जेवू दे पोटभर आणि अत्यंत मृदु आवाजात निळूभाऊ त्या भुकेल्या माणसाला म्हणाला ‘शांतपणे जेवा. कोणी तुम्हाला पानावरून उठविणार नाहीं. हं, करा सुरू.(Nilu Phule Story)
हे देखील वाचा – महेश कोठारेंच्या पत्नीने निवेदिता सराफ यांना चित्रपटात घेण्यासाठी दिला होता नकार
यापुढे राम यांनी म्हटलंय, या प्रसंगाला आता अनेक वर्षे झाली, पण आजही ते दृश्य डोळ्यासमोर तरळतं आणि निळूभाऊंचे ‘माणूसपण’ मनात साठवत !
निळूभाऊ हा अवलिया जसा पडद्यावर दणकट होता त्याउलट खऱ्या आयुष्यात तो अतिशय सौम्य मृदू होता.