बरेचदा कस असतं, कलाकारांचं सिनेमात जेव्हा सिलेक्शन होत तेव्हा त्या आधी दिग्दर्शक, आणि इतर टीम ते पात्र ती भूमिका तो कलाकार निभावेल की नाही यावर गहन चर्चा केली जाते. नववंडीच्या काळापासून ते आजवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या भूमिका तंतोतंत साकारत पार पाडल्या. मात्र चित्रपटसृष्टी काम करताना कधी कधी त्यांना या भूमिका ऑफर न केल्याने, वा चर्चेत ते पात्र योग्य बसत नसल्याने त्या कलाकारांना ती भूमिका मिळत नाही. हे सर्व सांगण्या मागचं कारण म्हणजे महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरच काही’ या पुस्तकात असाच एक किस्सा त्यांनी सांगितला आहे.(Nivedita Saraf Mahesh Kothare)
महेश कोठारे आणि निवेदिता सराफ यांचा हा किस्सा आहे. महेश कोठारे आणि निवेदिता सराफ यांनी माझा छकुला, दे दणादण, धुमधडाका, थरथराट या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘धुमधडाका’ आणि ‘दे दणादण’ हिट गेल्यानंतर महेश कोठारे आणि निवेदिता यांची चांगली जोडी जमली होती. थरथराट चा अनुभव सांगताना महेश कोठारे यांनी सांगितलं आहे की, ‘थरथराट’साठी माझ्याबरोबरच्या नायिकेसाठी निवेदिताचा मी विचार करीत होतो. त्यावेळी नीलिमानं मात्र या चित्रपटासाठी दुसरी नायिका निवड, असं मला सांगितलं, दरम्यान महेश कोठारे यांनी चित्रपटाचे निर्माते अरविंद यांनाही निवेदिताच्या जागी दुसरी मुलगी घेत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
नीलिमाच्या नकारावर महेश कोठारेंची काय होती रिऍक्शन (Nivedita Saraf Mahesh Kothare)
सगळं झाल्याप्रमाणे नवीन मुलीसाठी ‘ऑडिशन्स’ ही सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात महेश कोठारे यांनी निवेदिता यांना फोन करून शूटिंगसाठी काही तारखा रिझर्व्ह करून ठेवण्यास सांगितलं होत. ऑडिशन्स बाबत बोलताना त्यांनी लिहिलंय, नीलिमाला दररोज ‘ऑडीशन्स’चे अपडेट मिळत होते आणि तोवर एकही मुलगी आमच्या पसंतीस उतरली नव्हती. आता आमचं शूटिंग सुरू व्हायला अगदी काही दिवसच राहिले होते. त्यावेळी शेवटी नीलिमाच मला म्हणाली, “महेश, मला वाटतं की आपल्या चित्रपटासाठी निवेदिताच चांगली राहील! तिलाच घे तू!” दिग्दर्शकानं सर्वांचं मत ऐकावं; पण शेवटी ‘ऐकावं जनाचं करावं मनाचं, ‘ हेच खरं!(Nivedita Saraf Mahesh Kothare)
महेश कोठारे यांच्या पत्नी नीलिमा यांनी निवेदिता यांना आधी का नकार दिला हा मुळी प्रश्नच पडलाय. ‘थरथराट’ मधील त्यांची भूमिका ही निवेदिता यांनी चोख पार पाडली.