‘तो हात मिळवणार इतक्यात खाली कोसळला आणि दुर्घटना घडली’

Mahesh Kothare Shares Rupeshkumar Death Incident
Mahesh Kothare Shares Rupeshkumar Death Incident

काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शित झाल्या झाल्या प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवत नाहीत वा बॉक्स ऑफिसवर हिट होत नाहीत. मात्र काही चित्रपट असे असतात जे टेलिव्हिजनवर लागल्यावर लोकप्रियता मिळवतात. आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असाच एक चित्रपट म्हणजे माझा छकुला. महेश कोठारे दिग्दर्शित माझा छकुला हा चित्रपट होता. या चित्रपटातून अभिनेता आदिनाथ कोठारेने सिनेमाविश्वात पदार्पण केले आहे. दरम्यान या चित्रपटाला खूप नामांकन आणि पुरस्कारही मिळाले.(Mahesh Kothare Shares Rupeshkumar Death Incident)

photo credit : google

याबाबत बोलताना डॅम  इट आणि बरंच  काही या पुस्तकात महेश कोठारे यांनी लिहिलंय, माझा छकुला’चा ‘प्रीमियर शो’ पुण्याच्या ‘प्रभात’मध्ये आयोजित करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी साफ नाकारलं. चित्रपटाचं बजेट खूप मोठं नसल्यामुळे मला मोठा आर्थिक फटका बसला नाही. मला सहन होईल एवढाच हा धक्का होता.या चित्रपटातदेखील लक्ष्याची चांगली आणि वेगळी भूमिका होती. परंतु प्रेक्षकांना अपेक्षित असलेलं माझं आणि त्याचं ‘कॉम्बिनेशन’ त्यात नव्हतं. निवेदिता सराफनंही मुख्य भूमिका चांगली साकारली होती.

कोठारेंनी सांगितला रुपेश कुमार यांच्या मृत्यूचा किस्सा (Mahesh Kothare Shares Rupeshkumar Death Incident)

अर्थात हा चित्रपट यशस्वी न ठरण्यामागे हेच एकमेव कारण नसावं. त्यात काही त्रुटी नक्कीच राहिल्या होत्या. मात्र आश्चर्य म्हणजे काही काळानं हा चित्रपट जेव्हा टीव्हीवर आला तेव्हा त्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं.. आदिनाथला सगळे लोक ओळखू लागले. शाळेमधील मुलांमध्ये त्याच्या नावाची भरपूर चर्चा झाली. एखादी कलाकृती चित्रपटगृहांमध्ये अपयशी ठरते आणि तीच कालांतरानं टीव्हीवर मोठं यश मिळवते, हे माझ्या दृष्टीनं न उलगडणारं एक कोडंच होतं.(Mahesh Kothare Shares Rupeshkumar Death Incident)

photo credit : google

‘माझा छकुला’बद्दल घडलेली एक चांगली गोष्ट म्हणजे ‘स्क्रीन’ पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटासाठी महेश कोठारे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे त्या वर्षांपासून ‘स्क्रीन’नं पहिल्यांदाच मराठी-हिंदी चित्रपटांना पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली होती, आणि पहिल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून महेश कोठारे मानकरी ठरले होते. २९ जानेवारी १९९५ ला गोरेगावच्या ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’मधील हेलिपॅडवर हा पुरस्कार सोहळा झाला होता. या सोहळ्याबाबत बोलताना महेश यांनी लिहिलंय, या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी डॅडी, नीलिमा, आदिनाथ आणि मी असे चौघेजणच चित्रनगरीत गेलो होतो. त्या दिवशी जेनमा घरीच थांबली होती. हा पुरस्कार सोहळा माझ्या चिरस्मरणी राहिलाय, तो दोन कारणांसाठी.

हे देखील वाचा – द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आणि दादांच्या कपाळावर आदळली गदा रक्तबंबाळ कपाळाने शूट केला होता ‘तो’ सीन..

पहिलं कारण म्हणजे मृत्यूचं. मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेलं एक धक्कादायक रूप. प्रसिद्ध अभिनेता रुपेशकुमारशी माझा चांगला स्नेह. तो देखील या सोहळ्याला आला होता. लांबून त्यानं मला पाहिलं, “हाय महेश!” असं म्हणत तो मला हस्तांदोलन करण्याच्या हेतूनं माझ्याकडे यायलाही लागला आणि माझ्यापर्यंत पोहोचण्या आधीच अचानक खाली कोसळला. त्यामुळे तिथं मोठी धावपळ झाली. काहींना वाटलं की त्याला भोवळ आली असावी; पण रुपेश एकंदरीत कोसळण्यावरून आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तो हे जग सोडून गेल्याचं मला तेव्हाच कळलं होतं.

कोठारेंनी सांगितला अवॉर्ड सोहळ्यातील घडलेली घटना (Mahesh Kothare Shares Rupeshkumar Death Incident)

लगेचच त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि मग त्याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं. ज्याला मी चांगलं ओळखत होतो, ज्यानं माझं नाव घेऊन मला हाक मारली, आणि अवघ्या काही सेकंदांमध्ये आमचं हस्तांदोलनही होणार होतं, आणि त्या व्यक्तीचं असं क्षणार्धात जाणं हे काही केल्या मनाला पटत नव्हतं. हा मोठा धक्का मनात ठेवूनच मी पुरस्कार सोहळा पाहू लागलो.(Mahesh Kothare Shares Rupeshkumar Death Incident)

ऐन पुरस्कारादरम्यान घडलेली ही घटना ऐकून अंगावर काटे उभे राहिले. आवाज देऊन हात मिळवायला येणाऱ्या व्यक्ती समोर येताच कोसळणं आणि मृत्यु होणं हे पचवणं थोडं जड जातंय. महेशजींनी सांगितलेला हा किस्सा न विसरणारा आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Queen of 80s faced worst things
Read More

शूटिंगदरम्यान जबरदस्ती केल्याने ‘या’ अभिनेत्रीने ठोकला सिनेविश्वाला रामराम

या घटनेनंतर अचानक अर्चना रुपेरी पडद्यावरून गायब झाली. करियरच्या टर्निंग पॉइंटवर असतानाच अर्चनाने लग्नाचा निर्णय घेतला आणि ती थेट अमेरिकेत स्थायिक झाली.
Mahesh Kothare Nilima Kothare
Read More

“खबरदार पुन्हा असं काही बोलशील तर!” महेश कोठारेंना दिली पत्नीने धमकी

पहिली माझी आई जेनमा आणि दुसरी माझी पत्नी नीलिमा! नीलिमा यांनी पत्नी म्हणून महेश यांची प्रत्येक काळात साथ दिली.
Dattu More Wedding News
Read More

‘म्हणून दत्तूने खाल्ला समीरचा ओरडा’ पाहा दत्तू ने लग्नाची बातमी सांगितल्यावर काय होत्या हास्य जत्रेतील मित्रांच्या रिअक्शन

अनेक कलाकार नेहमी चर्चेत असतात त्यांच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे. सध्या असाच एक चर्चेचा विषय आहे तो…
Ashok saraf Sulochana Latkar
Read More

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केले सुलोचना लाटकर कुटुंबियांचे सांत्वन

सुलोचना लाटकर यांच्या अंत्यदर्शनाला अभिनेते सचिन पिळगांकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ तसेच राजकीय क्षेत्रातून मनसे अध्यक्ष
Dattu Mores Honeymoon
Read More

पहा दत्तू मोरे चाललाय या ठिकाणी हनिमूनला

लग्न संभारंभ, प्री वेडिंग फोटोशूट उरकल्यानंतर आता दत्तू त्याच्या बायकोला घेऊन कुठे हनिमूनला जाणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.