“मरावे परी कीर्ती रुपी उरावे” हे समर्थ रामदासांचे शब्द महाराष्ट्राचे लाडके खलनायक निळू फुले यांच्या कीर्तीच्या साचात अगदी बरोबर बसतात. निळू फुले यांनी मराठी चित्रपट सृष्टीला मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या “बाई वाड्यावर या” हा डायलॉग संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला. परंतु ते जसे पडद्यावर दिसायचे त्यापेक्षा त्यांच्या खऱ्या आयुष्यात ते फार वेगळे होते. जरी त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात ते खरे “नायक” होते. असं त्यांच्या परिचयात असलेले लोक सांगताना दिसतात. आज निळू फुले यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांची कन्या गार्गी फुलेने वडिलांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केलीये. (Nilu Phule Birthday Special)
गार्गीने तिच्या इंस्टाग्रामवर निळू फुलेंचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोच्या कॅप्शन मध्ये “Happy Birthday बाबा…. आज तूझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘निळू फुले सन्मान’ या तुझ्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची पुन्हा एकदा घोषणा करते आहे याचा अत्यंत आनंद होतो आहे.7-8 तारखेला जरूर या सगळ्यांनी… वाट पाहते… गार्गी फुले” असं गार्गीने म्हंटल आहे.
हे देखील वाचा: ‘बाबाला कर्करोग असल्यानं उपचारासाठी हॉस्पिटलला असताना लिहायचे आईला पत्र’ जुनी पत्रं वाचून पृथ्वीकची भावुक पोस्ट
निळू फुले यांच्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा ‘निळू फुले सन्मान’ या पुरस्काराची घोषणा गार्गीने केली आहे. या व्यतिरिक्त प्रसिद्ध दिग्दर्शक प्रसाद ओकने सुद्धा गेल्यावर्षी घोषणा केल्यानुसार तो लवकरच निळू फुले यांच्या आयुष्यावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. तर निळू फुले यांची भूमिका कोणता कलाकार पडद्यावर हुबेहूब साकारण्यात यशस्वी होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. (Nilu Phule Birthday Special)
कलाकार घडवता येत नाही, तर कलाकार हा जन्माला यावा लागतो असं म्हणतात. या दोन्ही बाजूंचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल या दोन्ही गोष्टीला नशीब या शब्दाची जोड असल्याशिवाय कोणत्याच गोष्टीला अर्थ नाही. तसेच नशीब निळू फुले या कलाकाराचे आहे. त्यांच्या नशीब आणि कलेने त्यांना योग्य साथ दिल्यामुळे ते यशाचे शिखर सर करू शकले. निळू फुले सध्या आपल्या मध्ये जरी नसले तरी सुद्धा ते त्यांच्या अभिनयाने आपल्यात नेहमी जिवंत असतील.