शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चला हवा येऊ द्या’ बंद होताच नवा कार्यक्रम सुरु होणार, नव्या प्रोमोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, व्हिडीओ पाहिलात का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 30, 2023 | 1:04 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Zee Marathi New Promo

'चला हवा येऊ द्या' बंद होताच नवा कार्यक्रम सुरु होणार, नव्या प्रोमोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, व्हिडीओ पाहिलात का?

‘झी मराठी’ वाहिनी गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. आजवर या वाहिनीने आशयघन विषय, विनोदी विषय हाताळत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेली दहा वर्षे प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करणारा एक कार्यक्रम निरोप घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांतच ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात या कार्यक्रमाचं चित्रीकरण येऊन ठेपलं आहे. काही वर्षांपासून या कार्यक्रमाने टीआरपीचा तळ गाठला असल्याकारणाने हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं समोरं आलं आहे. (Zee Marathi New Promo)

‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम बंद होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी ‘झी मराठी’ वाहिनी लवकरच एका नव्या कार्यक्रमासह सज्ज होणार आहे. या नव्या कार्यक्रमाचे प्रोमो समोर आले आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या कार्यक्रमाचे प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार…लवकरच खेळ सुरू होणार, झी मराठीवर… ‘असं कॅप्शन देत त्यांनी नवे प्रोमो शेअर केले आहेत.

आणखी वाचा – सायली- अर्जुन होणार आई बाबा?, अखेर डॉक्टरांनी केला शिक्कामोर्तब; सुभेदारांच्या घरात पसरलंय आनंदाचं वातावरण

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

‘झी मराठी’ वाहिनीने हे शेअर केलेले दोन नवे प्रोमो पाहता, नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहीलं आहे, “आम्ही उत्सुक आहोत. काय आहे?”. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, “‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ बंद होणार आहेत. रात्री ९ ते १० मध्ये तीन मालिका डिसेंबर महिन्यात ‘झी मराठी’वर भेटीला येणार आहे.” तर अनेकांनी अमोल कोल्हे मुख्य भूमिकेत असणार असल्याच्या कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – नाकात नथ, पारंपरिक साडी अन्…; सुगंधा मिश्राने महाराष्ट्रीयन पद्धतीने केलं ओटीभरण, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

‘झी मराठी’ वाहिनी आता हा नवा कोणता खेळ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची जागा आता हा नवा कार्यक्रम घेणार का? असा प्रश्नही चाहत्यांमध्ये पडला आहे. शिवाय या नव्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार याकडे ही साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Tags: entertainmentmarathi actormarathi serialnewserialzee marathiZee Marathi New Promozee marathi new show
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Jhimma 2 Movie Teaser Out

"यावेळी खूपच व्हरायटी आहे", बहुचर्चित 'झिम्मा २'चा टीझर प्रदर्शित, गर्ल्स गँगची धमाल अन् रिंकू राजगुरूच्या लूकने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.