रोजच्या जीवनात आजूबाजूच्या परिस्थतीवर, सामाजिक घटकांवर निर्भीडपणे भाष्य करणारे, विचार मांडणारे बोटावर मोजण्याइतके उरले आहेत या मध्ये एक नाव प्रामुख्याने घेतलं जातं ते म्हणजे अभिनेते, दिगदर्शक ऋषिकेश जोशी. राजकीय किंवा सामाजिक कोणत्याही विषयावर अचूक वेळ साधत टिप्पणी करण ऋषिकेश यांच्या या कलेशी आपण सर्व चांगलेच परिचित आहोत. चित्रपट, नाटक यांच्या माध्यमातून विविध विषय ते हाताळत असतात. असाच सध्य परिस्थतीवर भाष्य करणार ‘ येतोय तो खातोय’ हे भन्नाट नाटक घेऊन ऋषिकेश जोशी(Hrishikesh joshi) रंगभूमीवर येत आहेत.
लोकनाट्यांच्या माध्यमातून नेहमी समाज प्रबोधनाचं काम वेगळ्या पद्धतीने केलं जात. मनोरंजनाच्या माध्यमातून सहज सोप्प्या पद्धतीने प्रबोधन केले जाते. मोरंजनाची हि धुरा विविध नाटकांच्या माध्यमातून सुयोग्य नाट्य संस्थने आतापर्यंत सांभाळली आहे. सुयोग्य नाट्यसंथा विजय कुवळेकर लिखित आणि ऋषिकेश जोशी दिगदर्शित ‘येतोय तो खातोय’ ही ९० वी कलाकृती घेऊन रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संदेश सुधीर भट सादरकर्ते असलेल्या या नाटकाचे निर्माते कांचन सुधीर भट, मोहन दामले, मिलन टोपकर, चंद्रशेखर आठल्ये आहेत.(Hrishikesh joshi)
हे देखील वाचा – हेमांगीची ‘पठाण’ बद्दल पोस्ट आणि चाहत्यांची नाराजी…
सध्याच्या राजकारणावर मार्मिकपणे भाष्य करणार लिखाण जेष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी केलं आहे. या नाटकाबद्दल दिगदर्शक ऋषीकेश जोशी(Hrishikesh joshi) म्हणातात ‘‘सध्याचं राजकारण आकलनापलीकडेच आहे. ‘येतोय तो खातोय’ या नाटकातून मनोरंजनाच्या माध्यमातून ‘राजकीय पोलखोल’ केली जाणार आहे’. ही पोलखोल करताना कोणाचीही राजकीय बाजू घेण्याचा व कोणाचाही राजकीय विरोध करण्याचा प्रयत्न या नाटकात नसणार आहे.
हृषिकेश जोशी, संतोष पवार, स्वप्नील राजशेखर, भार्गवी चिरमुले,अधोक्षज कऱ्हाडे, मयुरा रानडे, सलीम मुल्ला, ऋषिकेश वाबुंरकर हे कलाकार ‘येतोय तो खातोय’ नाटकात आहेत. नाटकाचे संगीत अजित परब यांचे तर नृत्यदिग्दर्शन मयूर वैद्य यांचे आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून प्रकाशयोजना प्रफुल दीक्षित यांची आहे. वेशभूषा महेश शेरला तर रंगभूषा शरद सावंत यांची आहे. दिग्दर्शन साहाय्य श्रद्धा पोखरणकर यांचे आहे. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी या धमाल नाटकाचा शुभारंभ होणार आहे.(Hrishikesh joshi)