हेमांगीची ‘पठाण’ बद्दल पोस्ट आणि चाहत्यांची नाराजी…

hemangi kavi on pathan
hemangi kavi on pathan

मनोरंजन म्हणलं कि यशा सोबत टीकेचे वार ही आलेच. यश आणि टीका अशा दोन्ही गोष्टींना तोंड देणारा शाहरुख खानचा ‘पठाण’ सध्या बॉक्स ऑफिस सोबतच सोशल मिडियावर सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे. बेशरम रंग गाण्याच्या वादानंतर पठाण चित्रपटावर काय परिणाम होणार याची चिंता सगळ्यांना होती पण त्यावादाचा चित्रपटावर काही एक परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही. पहिल्या दिवसापासून या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या चाहत्यांनी ‘पठाण’ला भरभरून प्रेम दिलं आहे.(hemangi kavi on pathan)

पठाण चित्रपटाच्या वादांसंदर्भात काही कलाकारांनी सुद्धा शाहरुखला पाठींबा देत वाद निर्माण करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. या कलाकारांमध्ये आता हेमांगी कवीने सुद्धा पुढाकार घेतला आहे आणि तिच्या या पोस्टवर चाहते काहीसे नाराज ही दिसत आहेत. शाहरुखच्या पठाण चित्रपतातील लुकचा फोटो शेअर करत हेमांगी म्हणते कि ‘ तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए पण आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची fan आहे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. 😝 असो.


मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःहाला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!!
सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना Theatre मध्ये आणणे हे हाच करू जाणे!(hemangi kavi on pathan)
स्वतःहाच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए! 🥰
पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया!
तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला!
बाकी…

झूमे जो पठान मेरी जान,
महफ़िल ही लूट जाए!’

हे देखील वाचा – शिरोडकर, प्राजक्ता तर आता मीराच्या भूमिकेतून केतकीच रुपेरी पडद्यावर पुन्हा आगमन…

हेमांगीच्या या पोस्ट वर काही चाहत्यांनी पाठिंबा तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. “पठाण मूवीमुळे मराठी शो टॉकीजला लागत नाही आहे.बंद पाडले आहेत सर्व मराठी मूवी त्यावर तुमचा काही नाही का आक्षेप?मॅडम तुम्ही नेहमी मराठी पिक्चर साठी लढा देतात.हे अचानक उमळलेलं शाहरुख बंद करा🙏” , “ताई खूप भावनिक झालात थोड्या भावना जपून ठेवा नंतर तुमच्या मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळणार नाहीत तेव्हा उपयोगी पडतील 😂😭” अशा कमेंट्स करून चाहत्यांनी नाराजीचा सूर दर्शवला आहे.(hemangi kavi on pathan)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
vanita kharat rohit shetty
Read More

रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात वनिता खरातची वर्णी

कोळीवाड्याची रेखा म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. वनिताने तिच्या विनोदी…
Satya Manjrekar controversy
Read More

‘वेडात मराठे वीर दौडले सात; चित्रपटात सत्या मांजरेकरच्या जागी या अभिनेत्याची एन्ट्री?

हल्ली छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासातील शूर योद्धे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचा सगळीकडे बोलबाला दिसत आहे. अनेक चित्रपट…
Amey Wagh
Read More

बॉलीवूडच्या मुख्य कलाकारांच्या यादीत अमेयचं नाव

मराठमोळा अभिनेता अमेय वाघ याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे घराघरातील तरूणाईला…
Tejashree Pradhan
Read More

तेजश्रीची लंडनला निघाली स्वारी, नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस

मालिकांमधून घराघरात पोहचली अभिनेत्री तेजश्री प्रधान हीने तिच्या अभिनय कौशल्याने देखील रुपेरी पडद्यावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण…
Subhedar Film motion poster
Read More

‘रक्तामंदी उसळं तापता लाव्हा…’ अंगावर शाहारे आणणारं सुभेदारच मोशन पोस्टर प्रदर्शित

अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकारी शूर मावळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची सध्या चांगलीच चलती…