२०२३ हे वर्ष संपून आता २०२४ हे नवीन वर्ष येणार आहे आणि येणारे हे नवीन वर्ष मनोरंजनाचा खजिना घेऊन येणार आहे. येणारे नवीन वर्ष हे अनेक गाजलेल्या कलाकृतींचे नवीन सीझन घेऊन येणार आहे. त्यामुळे ओटीटी वापरकर्ते आगामी नवीन वर्षाची वाट पाहत आहेत. ‘मिर्झापूर’, ‘पंचायत’, ‘आश्रम’ या गाजलेल्या वेबसिरीजचे नवीन सीझन येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहेत आणि यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. तसेच क्रूरता व रक्तपाताने भरलेल्या क्राईम थ्रिलर वेबसिरीजही चाहत्यांच्या भेटीला येणार असल्यामुळे येत्या नवीन वर्षात ओटीटी वापरकर्त्यांसाठी ओटीटी पर्वणी असणार आहे. (Upcoming OTT Series And Movies)
नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या वेबसिरीजपैकी एक असलेल्या ‘राणा नायडू’चा पुढील सीझन येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. या अॅक्शन, क्राईम व ड्रामा आसलेल्या सिरीजमध्ये सुरवीन चावला, राणा दग्गुबती व व्यंकटेश यांच्या भूमिका आहेत. ‘राणा नायडू’चा पहिल्या सीझनमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता येत्या दुसऱ्या भागांत प्रेक्षकांना काय पहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान ही सिरीज जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.
क्राइम थ्रिलर असलेले ‘ग्यारह-ग्यारह’ या चित्रपटाची कथा एका खुनाच्या केसपासून सुरू होते. काही महिन्यांपूर्वी याचा ट्रेलर आला होता. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता लागून राहिली होती. हा चित्रपट जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, मात्र त्याची अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी-५ वर प्रदर्शित होईल. यात राघव जुयाल व कृतिका कामरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
नीरज पांडेच्या ‘खाकी’ वेबसिरीजचा पहिला सीझन खूपच धमाकेदार होता. प्रेक्षकांनी याला खूपच चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता दुस-या सिझनची आतुरता लागली आहे. दुसऱ्या सीझनमधील प्रकारणांची पोलीस कोणत्या पद्धतीने उकल करणार हे पाहण्यासारखे असेल. ‘खाकी २’ ची प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी नेटफ्लिक्सवर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा – स्वानंदी टिकेकरची लग्नाची जोरदार तयारी, होणाऱ्या नवऱ्याने खास फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “सहा दिवस…”
‘She’ च्या आत्तापर्यंतच्या कथेत पोलिस हवालदार भूमिका ही पोलिसांची नोकरी सोडून गुन्हेगार बनली आहे. ड्रग्ज माफियाला पकडण्यासाठी भूमिकाला एका वेगळ्या भूमिकेत आणले होते पण ती धैर्याने स्वतःचा शोध घेऊ लागते आणि मग असे काही घडते की ती स्वतः गुन्हेगार बनते. त्यामुळे आता आगामी भागात काय पाहायला मिळणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आगामी वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात हा नवीन भाग प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.
ओटीटीवर प्रचंड गाजलेल्या ‘मिर्झापूर’ या वेबसिरीज तरुणांमध्ये खुपच क्रेझ पाहायला मिळाली होती. ‘मिर्झापूर’चा दूसरा भागही बराच गाजला. अशातच ‘मिर्झापूर-३’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा झाल्यामुळे चाहते खूपच उत्सुक आहेत. ही सिरीज नोव्हेंबर २०२४ मध्ये अॅमेझोन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होऊ शकते.