सोमवार, ऑक्टोबर 2, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - “छोटीशी भूमिका तरीही…”, ‘ताली’मध्ये केलेल्या कामाबाबत रवी जाधव यांच्याकडून हेमांगी कवीचं कौतुक, म्हणाले, “तिने ज्या प्रकारे…”

“छोटीशी भूमिका तरीही…”, ‘ताली’मध्ये केलेल्या कामाबाबत रवी जाधव यांच्याकडून हेमांगी कवीचं कौतुक, म्हणाले, “तिने ज्या प्रकारे…”

Sneha GaonkarbySneha Gaonkar
ऑगस्ट 23, 2023 | 4:23 pm
in OTT Special
Reading Time: 3 mins read
Ravi Jadhav On Hemangi Kavi

"छोटीशी भूमिका तरीही...", 'ताली'मध्ये केलेल्या कामाबाबत रवी जाधव यांच्याकडून हेमांगी कवीचं कौतुक, म्हणाले, "तिने ज्या प्रकारे..."

अभिनेत्री सुश्मिता सेन अभिनित ‘ताली’ या वेबसीरिजचं जगभरात कौतुक होत आहे. तृतीयपंथींच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या गौरी सावंत यांच्यावर आधारित ही वेबसीरिज आहे. या हिंदी वेबसीरिजमध्ये मराठी कलाकार भाव खाऊन गेले, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा पेलवली. तर या वेबसीरिजच्या लिखाणाची जबाबदारी क्षितिज पटवर्धन याने सांभाळली. इतकंच नव्हे तर मराठमोळ्या कलाकारांनी केलेला अभिनय मराठी सिनेसृष्टीचा नाव उंचावत आहे. (Ravi Jadhav On Hemangi Kavi)

अभिनेता सुव्रत जोशी, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, कृतिका देव, हेमांगी कवी या कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये उत्तम भूमिका केल्या. या प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेचं कौतुक होताना दिसतंय. स्क्रीन टाइम कमी असला तरी या वेबसीरिजमधील हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत राहिली. अशातच दिग्दर्शक रवी जाधव यांनी हेमांगी कवीचं कौतुक करणारी एक स्पेशल पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.

आणखी वाचा – “…आणि ते मला भिकारी समजले”, ‘ताली’मध्ये काम केलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “भीक मागण्यासाठी…”

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

ताली’ या वेबसीरिजमध्ये हेमांगी कवी हिने सायली हे पात्र साकारलं आहे. यात ती गौरी सावंत यांच्या बहिणीचे पात्र साकारताना दिसली. रवी जाधव यांनी हेमांगी कवीच्या भूमिकेचं कौतुक करत खास कॅप्शन दिले आहे. यांत त्यांनी म्हटलं आहे की, “हेमांगी कवी आमच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थीनी. तिने अभिनय केलेल्या ‘धुडगूस’ या सुंदर चित्रपटाची जाहिरात मी केली होती परंतु एकत्र काम पहिल्यांदाच ‘ताली’ मध्ये केले. छोटीशी व्यक्तीरेखा असुनही तीने ती ज्या ताकदीने साकारली आहे की जी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील!!!”.

आणखी वाचा – “शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती…”, मृणाल कुलकर्णींसाठी सूनबाईंची कौतुकास्पद पोस्ट, म्हणाल्या, “या क्षणाबद्दल…”

रवी जाधव यांनी कौतुकास्पद शेअर केलेल्या व्हिडिओवर हेमांगी कवीने प्रतिक्रिया दिली आहे. “खूप खूप धन्यवाद, सिनीअर” असे म्हणत हेमांगीने कमेंट केली आहे.

Tags: entertainmenthemangi kaviravi jadhavsushmita sentaali

Latest Post

Rutuja Bagwe has framed a photo of this special person in her new home
Marathi Masala

…म्हणून ऋतुजा बागवेने नवीन घरी लावला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो, खुलासा करत म्हणाली, “सकाळी उठल्यावर…”

ऑक्टोबर 2, 2023 | 6:42 pm
The Vaccine War director announcement
Bollywood Gossip

‘द वॅक्सिन वॉर’ चित्रपट पाहणाऱ्यांसाठी विवेक अग्निहोत्रींनी आणली ‘ही’ ऑफर! सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

ऑक्टोबर 2, 2023 | 5:11 pm
Deepa chaudhari gave special gift to kabir
Television Tadka

Video: ‘तू चाल पुढं’ मालिकेतील वैरींचा ऑफस्कीन आहे ‘असा’ बॉण्ड, धनश्री काडगावकरच्या लेकाचा व दीपा चौधरीचा व्हिडिओ चर्चेत

ऑक्टोबर 2, 2023 | 4:48 pm
Mahesh jadhav won gold medal
Trending

“शाळेत उंचीमुळे…”, ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “हे सुवर्णपदक घेऊन…”

ऑक्टोबर 2, 2023 | 3:11 pm
Next Post
Jawaan Movie

शाहरुख खानचा 'जवान' प्रदर्शनापूर्वीच अडचणीत, 'त्या' सात सीन्सवर सेन्सॉर बोर्डची कात्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist