शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहरुख खानचा ‘जवान’ प्रदर्शनापूर्वीच अडचणीत, ‘त्या’ सात सीन्सवर सेन्सॉर बोर्डची कात्री

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 23, 2023 | 4:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jawaan Movie

शाहरुख खानचा 'जवान' प्रदर्शनापूर्वीच अडचणीत, 'त्या' सात सीन्सवर सेन्सॉर बोर्डची कात्री

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान लवकरच त्याचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे काही दिवसच उरले आहेत. ‘पठाण’ला मिळालेल्या जोरदार यशानंतर शाहरुखचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्साहित झाले आहेत. चित्रपटाचे टिझर व गाणी आल्यानंतर पुढील आठवड्यात ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. एकीकडे शारुखच्या चित्रपटाची चर्चा सुरु असताना एक मोठी माहिती समोर आली आहे. शाहरुखच्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळाले खरे, मात्र त्यात ७ बदल करण्याचे बोर्डाकडून सुचवण्यात आले आहे. (Jawan Movie)

शाहरुखच्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘U/A’ दिला आहे. पण, चित्रपटात ७ आक्षेपार्ह सीन्समध्ये बदल करण्याचे सुचवले आहे. यामुळे चित्रपटाचा स्क्रीनटाइम १६९.१८ मिनिटांपर्यंत म्हणजेच २ तास ४० मिनिटे १९ सेकंदांपर्यंत कमी करण्यात आला आहे. ज्यात डोके नसलेल्या मृतदेहाचे दृश्य काढून टाकण्यात आलेले आहे. तर आत्महत्येच्या दृश्याची वेळदेखील कमी करण्यात आली आहे. शिवाय, चित्रपटात ज्यात ‘NSG’ चा उल्लेख काढून टाकणे, ‘राष्ट्रपती’चा उल्लेख ‘राज्यप्रमुख’ असा करणे व यांसारखे काही संवाद बदलण्याचे बोर्डाने सुचवले आहे.

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात सुचवले ‘हे’ ७ बदल

  1. चित्रपटात आत्महत्येच्या दृश्याचा कालावधी कमी करावा.
  2. डोके नसलेल्या मृतदेहाचे दृश्य काढून टाकावा.
  3. चित्रपटातील आवश्यक नसलेल्या संवादात ‘राष्ट्रपती’ हा शब्द काढून त्याऐवजी ‘राज्यप्रमुख’ असा उल्लेख करावा.
  4. ‘पैदा होके’ संवादात बदल करून त्याऐवजी ‘तब तक बेटा वोट डालना…’ असं वापरावे.
  5. ‘उंगली करना’ ऐवजी संवादात ‘उससे यूज करो’ असे वापरण्यास सांगितले आहे.
  6. ‘बिकॉज फॉरेन लॅग्वेंज आहे’ आणि ‘एक्सपर्ट ट्रेनर्स फ्रॉम माय कंपनी’ हे संवाद बदलण्याचे सुचवले आहेत.
  7. चित्रपटात ‘NSG’ ऐवजी ‘IISG’ असा शब्द वापरावा.

हे देखील वाचा – “छोटीशी भूमिका तरीही…”, ‘ताली’मध्ये केलेल्या कामाबाबत रवी जाधव यांच्याकडून हेमांगी कवीचं कौतुक, म्हणाले, “तिने ज्या प्रकारे…”

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

अटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटात शाहरुखसह नयनतारा, विजय सेथुपथी, प्रियमणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, गिरीजा ओक-गोडबोले आदी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोणही यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी तीन भाषांमध्ये देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Jawan Movie)

Tags: bollywood moviejawanshahrukh khan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Sai Lokur Troll

"तुला कसं कळालं की मुलगाच होणार?", सई लोकूरचे गरोदरपणातील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.