भारत हे महान राष्ट्र ज्याप्रकारे सर्वाना सामावून घेत त्याच प्रेमाने इथल्या भाषाही एकमेकांना आपल्याशा वाटू लागतात. सर्व जाती धर्मांप्रमाणेच सर्व भाषांवर ही तितकंच प्रेम केलं जात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा करून देणार ट्विट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी कडून करण्यात आलं आहे. नवाजउद्दीन हे नाव उत्कृष्ट अभिनयासाठी जाणलं जात. थिएटर पासून सुरुवात केलेला हा अभिनेता आज मोठ्या अभिनेत्यांच्या यादीत गणला जातो. नवाजउद्दीन विविध वेब सिरीज चित्रपट यांमधून खलनायकी भूमिका पार पडत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणास यशस्वी ठरला आहे.(Nawazuddin Siddiqui)
मराठी भाषा दिनाला अनुसरून नवाजुद्दीन एक ट्विट करत म्हणाला आहे ‘मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे ! मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच !सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा !! लवकरच @abhijitpanse यांच्या सोबत काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे. #जयमहाराष्ट्र’.

ट्विट मध्ये त्याने त्याला मराठी भाषेविषयी असलेला कळवळा व्यक्त केला आहे. तर तो मराठी लोककलेचा चाहता आहे अस देखील तो म्हणाला आहे. या सोबतच अजून एक महत्वाची घोषणा त्याने केली आहे. लवकरच तो मराठी दिगदर्शक अभिजित पानसे यांच्या सोबत एका नवीन प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. तर पोस्टच्या शेवटी त्याने जय महाराष्ट्र लिहिलं आहे.
शिव ठाकरे पोहचला शिवतीर्थावर

नवाजुद्दीन ने या आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका केली होती. तर आता राज ठाकरे यांच्या वर आधारित चित्रपट येणार का? आणि त्यामध्ये नवाजुद्दीन कोणती भूमिका साकारणार का? हे पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान आज नवाजउद्दीन ने राज ठाकरे यांची सुद्दा भेट घेतली आहे. ही भेट आणि बातमी निव्वळ योगायोग आहे कि खरच आगामी चित्रपटाचा भाग आहे हे कळायला मार्ग नाही.(Nawazuddin Siddiqui)
====
हे देखील वाचा – मोठ्या स्टार सोबत चित्रपट,मोठ्या शो मध्ये इंट्री शिव ठाकरे ने सांगितले त्याचे आगामी प्रोजेक्ट्स
====
तर बिग बॉस १६ चा उपविजेता शिव ठाकरे ने देखील राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर शिव देखील या प्रोजेक्टचा भाग असणार का या बद्दल देखील शिव चे चाहते उत्सुक दिसत आहेत. थोडक्यात काय तर मराठी भाषेवर प्रेम करणारा फक्त मराठी भाषिकच नाही तर सर्वच जाती धर्मीय परभाषिक हे मराठी भाषेवर प्रेम करतात हे दिसून आले आहे.