शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठ्या स्टार सोबत चित्रपट,मोठ्या शो मध्ये इंट्री शिव ठाकरे ने सांगितले त्याचे आगामी प्रोजेक्ट्स

सौरभ जाधवby सौरभ जाधव
फेब्रुवारी 20, 2023 | 1:42 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
shiv thakare projects

shiv thakare projects

बिग बॉस हिंदीच्या १६व्या पर्वाने नुकत्याच साऱ्या प्रेक्षकांचा निरोप घेतला. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन विजेतेपदाचा मानकरी ठरला. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळाली. यांत पुण्याच्या एमसी स्टॅनने बाकी मारली असून शिव ठाकरेने उपविजेता पदावर समाधान मानले आहे. शिव ठाकरेने बिगबॉस हिंदीचे विजेतेपद जिंकले नसले तरी प्रेक्षकांची मन मात्र त्याने जिंकली आहेत. (shiv thakare projects)

बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर शिव ठाकरे आता बिग बॉस १६चे विजेतेपद जिंकेल अशी आशा सर्वांनाच वाटत होती. मात्र असे झाले नाही. अखेरच्या क्षणी एमसी स्टॅनला विजेता घोषित करण्यात आले आणि शिव ठाकरे रनरअप ठरला.

मराठी मुळे शिवला आधीच चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती, प्रेक्षकांच्या मनावर त्याने तेव्हापासूनच राज्य केले होते. त्यानंतर आता बिगबॉस हिंदीमुळे शिव ठाकरे हा घराघरांत पोहचलेला पाहायला मिळतोय. शिव सोशल मीडियावर ही चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावरून तो चाहत्यांच्या सतत संपर्कात असतो. बिगबॉस हिंदीच्या घरातून बाहेर येताच त्याने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून लाईव्ह येत संवाद साधलाय.

इन्स्टा लाईव्हमध्ये काय म्हणाला शिव?(shiv thakare projects)

अंधेरी येथील एका कॅफेमध्ये शिव ठाकरेने लाईव्ह येऊन हा संवाद साधलेला आहे. या संवादादरम्यान त्याने लाईव्ह येत चाहत्यांना उत्तरं दिली. आणि काही चाहत्यांशी व्हिडिओच्या माध्यमातूनही लाईव्हवरच संवाद साधला. दरम्यान शिव ठाकरेने एक मोठं सरप्राइजदेखील त्याच्या चाहत्यांना दिले आहे.

या संभाषणादरम्यान शिवने लवकरच एका मोठ्या चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा केली आहे. याबद्दल विशेष काहीच सांगितले नसले तरी या मोठ्या चित्रपटात शिव ठाकरे एका मोठ्या स्टारसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान एका चाहत्याने शिवला प्रश्न केला की, तू खतरो के खिलाडीमध्ये येणार का? याबद्दल बोलताना शिव असे म्हणाला की, ‘लवकरच मी ‘खतरो के खिलाडी’ मध्ये दिसणार असल्याची शक्यता आहे पण त्याविषयी फायनल बोलणं अजून बाकी आहे.(shiv thakare projects)

====

हे देखील वाचा- म्हणून मकरंद अनासपुरे यांना बघून मिसेस अनासपुरेंनी किंचाळत, जोरात दरवाजा लावला…

====

शिवच्या बोलण्यावरून तो ‘खतरो के खिलाडी’मध्ये येणार असल्याची जास्त शक्यता दिसतेय. शिवने  दिलेल्या या बातमीने त्याचे चाहते उत्सुक आहेत. लवकरच तो याबद्दल अधिकृत माहिती देणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. आता शिव नेमका कोणत्या स्टारसोबत आणि कोणत्या चित्रपटात झळकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवच्या आगामी प्रोजेक्टला घेऊन प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. 

Tags: big bossbig boss 16its majjakhatro ke khiladinew movienew showshiv thakare
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
saorabh choughule

जीव माझा गुंतला मधील अभिनेत्याचा अपघात 'जीव पेक्षा मोठं काही नाही' म्हणत दिली माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.