‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सध्या एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार लीलाच्या प्रेमाच पडल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सध्या मालिकेत लीला आणि एजेचं नातं एका वेगळ्या वळणावर आहे. आता हळुहळू एजेच्या मनात लीलाविषयी प्रेम निर्माण होतं. आपण लीलाशिवाय जगू शकणार नाही याची जाणीव एजेला झालेली असते. पण, आता एजे ही सर्वांसमोर केव्हा मान्य करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अशातच आता मालिकेत त्यांची पहिली मकरसंक्रांत साजरी होणार आहे. मकरसंक्रांतीनिमित्त एजेने लीलासाठी खास हलव्याचे दागिने बनवले आहेत आणि याचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Navri Mile Hitlerla serial update)
या नवीन प्रोमोमध्ये एजे लीलाच्या घरी आला असून तो तिच्यासाठी यंदाची त्यांची पहिली मकरसंक्रांत खास करणार आहे आणि यासाठी तो स्वत: मेहनत घेणार आहे. यावेळी लीलाचे आई-वडील एजेंना काही करायचं असेल तर आम्ही करतो असं म्हणतात. पण सासू-सासऱ्यांचे काहीच न ऐकता एजे बायकोसाठी हलव्याच्या दागिन्यांची तयारी करतात. यावर एजे असं म्हणतात की, “लीलाची ही पाहिलीच मकर संक्रांत आहे तर तिच्यासाठी मी हलव्याचे दागिने बनवत आहे”.
आणखी वाचा – सैफ अली खानला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षावाल्याला बक्षिस, मिळाली रोख रक्कम कारण…
यानंतर रेवती यशला व्हिडीओ कॉलवर सांगते की, यश एजे स्वत:च्या हातांनी ताईसाठी हलव्याचे दागिने बनवत आहेत. मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “खूप सुंदर, माझी आवडती मालिका, एजेंसारखा नवरा प्रत्येकीला मिळो” अशा अनेक कमेंट्स करत प्रेक्षकांनी या प्रोमोला प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – Chhaava Movie : विकी कौशलचे ‘छावा’मधील रौद्र रुप समोर, लूकने वेधलं लक्ष, प्रेक्षकांना ट्रेलरची प्रतिक्षा
दरम्यान, मालिकेत सध्या एकीकडे एजेला तो लीलाच्या प्रेमात पडला आहे, याची जाणीव झाली आहे. तर दुसरीकडे लीलाच्या आयुष्यात मन्या नावाची व्यक्ती आली आहे. खरं तर हा सरस्वतीचा भाऊ विक्रांत आहे, जो वेशभूषा बदलून आला आहे. पण त्याच्या येण्याने आता लीला-एजेच्या आयुष्यात काय नवं वळण येणार? या मित्रामुळे दोघांच्या नात्यात काय बदल होणार का? लवकरच पाहायला मिळेल.