अभिनेत्री करीना कपूर सध्या खूप चर्चेत आहे. आजवर करीना अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसून आली आहे. मात्र सध्या ती कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. करीनाचा पती व अभिनेता सैफ अलीवर राहत्या घरी एका चोराने धारधार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात सैफवर सध्या उपचार सुरु आहेत. तो आता सुखरूप असून लवकरच त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.करीना ही नेहमी सैफबरोबर असलेली दिसून येत आहे. तसेच सैफवर हल्ला केलेला हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. करीना तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असलेली बघायला मिळते. (kareena kapoor religion)
करीना २०१२ साली सैफ अली खानबरोबर लग्नबंधनात अडकली. मुस्लिम व्यक्तीबरोबर लग्न केल्याने तिला ट्रोलदेखील केले. मात्र या ट्रोलिंगकडे तिने अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे करीना हिंदू व मुस्लिम यापैकी कोणत्या धर्माचे पालन करते? असा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडतो. याबद्दल तैमुर व जेहची नॅनी ललिता डिसिल्व्हा यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. ललिता यांनी काही दिवसांपूर्वी ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी करीना कोणत्या धर्माचे पालन करते याबद्दल सांगितले आहे.
ललिता यांनी सांगितले की करीना आईचा धर्म ख्रिश्चन धर्माचे पालन करते. तसेच आपल्या मुलांना प्रत्येक धर्माबद्दल शिकवते. ती तिच्या मुलांना प्रत्येक धर्माची शिकवण देते. होळीपासून ईदपर्यंत प्रत्येक सण ती आपल्या कुटुंबासह व मुलांसह मोठ्या थाटामाटात साजरा करते. करीना तिच्या मुलांच्या सांगोपनामध्ये अजिबात कसर सोडत नाही. ती मुलांच्याबाबतीत खूप शिस्तप्रिय व काटेकोर आहे. मुलांच्या संगोपनाकडे ती विशेष लक्ष देते.
करीनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. या चित्रपटांमध्ये तिच्याबरोबर अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पदूकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर असे अनेक दिग्गज कलाकार दिसून आले होते.