‘नवरी मिळे हिटलरला’ या झी मराठीवरील मालिकेत दिवसेंदिवस अनेक ट्विस्ट येत आहेत. अशातच मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला तो म्हणजे यशच्या लग्नाचा. लीलाने रेवतीला तिचे लग्न यशबरोबर लावून देणार असल्याचे वचन दिलं आहे. पण एजेंच्या मनात काही वेगळंच आहे. श्वेताचे एजेंबरोबर लग्न ठरले होते, पण काही कारणांमुळे लीलाचे लग्न एजेंबरोबर होते. त्यामुळे आता एजे श्वेताबरोबर यशचे लग्न लावणार आहे. मालिकेच्या नुकत्याच झालेल्या भागात एजेंनी घरातील सर्वांना यश व श्वेता यांच्या लग्नाबद्दल सांगितलं. मात्र या लग्नामुळे घरातील काही मंडळी खुश आहेत तर काही नाखुश आहेत. (Navri Mile Hitlerla Serial Updates)
यश व रेवती यांचे लग्न होणार असल्याचे वचन लीलाने रेवती व तिच्या आईला दिलं आहे. त्यानुसार जेव्हा एजे यश व रेवतीच्या लग्नाबद्दल सर्वांना सांगतात तेव्हा लीलाला यशने खरं काय ते सांगावं असं वाटतं. पण यश सर्वांसमोर काहीही बोलत नाही. त्यानंतर एजे यशसाठी त्यांच्या व्यवसायातील शेअर देणार असल्याचे सांगातात. यावरुन आता घरात काही वाद होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. मात्र यश व रेवती यांच्या लग्नामुळे लीला आता एजेंच्या विरोधात जाणार आहे असं दिसत आहे. मालिकेच्या या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये लीला यश व श्वेता यांच्या साखरपुड्याची तयारी करायला सांगत आहेत. यामुळे लीला एजेंवर चिडते आणि ती त्यांना असं म्हणते की, “यश आणि श्वेता यांचा साखरपुडा तुम्ही कसा करता हेच मी बघते”. यावर एजे तिला काहीही करुन हा साखरपुडा होणारचा असल्याचे सांगतात. यावर लीलाला एजेंना आव्हान देते आणि म्हणते की, “मी पण तुम्हाला चॅलेंज देते की, काहीही झालं तरी तुम्ही यश व रेवतीचं नातं तोडू शकणार नाही”.
आणखी वाचा – “हा केवळ अपघात नसून हत्याच…”, ‘अनुपमा’ सेटवरील लाईटमनच्या मृत्यूप्रकरणी मोठा वाद, नुकसान भरपाईचीही मागणी
त्यामुळे आता यश व श्वेता यांच्या होणाऱ्या लग्नामुळे जहागीरदार कुटुंबामध्ये वाद होणार आहेतच. पण लीला व एजे यांच्या नात्यावरही त्याकहा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल की यश व रेवती यांचे लग्न लावण्यात लीला यशस्वी होणार की एजे त्यांचा शब्द पूर्ण करणार? त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.