चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटातील ‘दुर्गा’ यांचं निधन झालं आहे. उमा दासगुप्ता यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. १८ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले. अनेक वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचे नातेवाईक, अभिनेते आणि राजकारणी चिरंजीत चक्रवर्ती यांनी दुजोरा दिला आहे. (Uma Dasgupta Passed Away)
अभिनेता आणि खासदार चिरंजीत चक्रवर्ती यांनी अभिनेत्रीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. उमा दासगुप्ता यांच्या मुलाने चिरंजीत चक्रवर्ती यांना त्यांच्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. उमा दासगुप्ता यांच्या निधनाने चिरंजीत चक्रवर्ती यांनाही दु:ख झाले आहे. याशिवाय टीएमसी खासदार आणि लेखक कुणाल घोष यांनीही उमा दासगुप्ता यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – 19 November Horoscope : मेष, धनू व कुंभ राशीच्या लोकांना मंगळवारी होणार आर्थिक लाभ, अधिक जाणून घ्या…
उल्लेखनीय आहे की उमा दासगुप्ता यांनी त्यांच्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटात अशी भूमिका साकारली होती, जी आजही लोकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटात ही अभिनेत्री ‘दुर्गा’च्या भूमिकेत दिसली होती आणि तिने चित्रपटात अपूच्या मोठ्या बहिणीची भूमिका केली होती. मात्र, त्यानंतर ती पुन्हा पडद्यावर दिसली नाही. आपल्या पहिल्याच चित्रपटाने लोकांची मने जिंकणाऱ्या उमा यांनी स्वत:ला इंडस्ट्रीपासून दूर केले आणि ती कधीही कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.
उमा दास गुप्ता लहानपणापासूनच थिएटरमध्ये सहयोगी होत्या. त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक हे दिग्दर्शक सत्यजित रे यांचे मित्र होते. मागील काही दिवसांपासून उमा दासगुप्ता यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी उमा आता आपल्यात नसल्या तरी त्यांची व्यक्तिरेखा लोकांच्या हृदयात कायम जीवंत राहतील.