‘अनुपमा’ ही स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीत टॉपवर असते. त्यामुळे ही मालिका कायमच चर्चेत असते. पण नुकतच या मालिकेच्या सेटवर एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये सेटवरील एका असिस्टंट लाईट मॅनचा मृत्यू झाला होता. गुरुवारी, १४ नोव्हेंबर रोजी ‘अनुपमा’च्या सेटवर असिस्टंट लाइटमनला विजेचा धक्का लागला. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावर आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने कारवाई करत मृत पावलेल्या व्यक्तीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. (Anupama Serial Set Lightman Death)
याप्रकरणी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे . त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून त्याची प्रत X वर टाकण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता सेटवरील उपकरणे खराब असल्याने हा अपघात झाल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे विजेचा धक्का बसला. या घटनेनंतरही मध्यरात्रीपर्यंत शूटिंग सुरु राहिले आणि मग दुसऱ्या दिवशीही पुन्हा नेहमीच्या हे शूटिंग सुरु झाले. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी सांगितले की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Shocking Negligence Exposed!
— All Indian Cine Workers Association (@AICWAofficial) November 18, 2024
The Tragic Death of a 32-year-old Worker on the Shooting Set of Anupamaa Serial due to Electrocution isn’t an Accident—it’s Institutionalized Murder caused by Greed and Negligence of Producers, the Poduction House, and the Channel |
Despite the… pic.twitter.com/pMiVNMRstv
या संपूर्ण प्रकरणी निर्माते मृत व्यक्तीची ओळख उघड करण्यास तयार नाहीत. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, सुरेश गुप्ता यांनी झूम टीव्हीला सांगितले की, “प्रोडक्शन हाऊस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. काही प्रोडक्शन हाऊस आणि चॅनेल्स थोडे पैसे वाचवण्यासाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करत नाहीत”. तसंच हा केवळ एक अपघात नसून निर्मात्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेली ही एक प्रकारची हत्याच असल्याचा दावा ‘एआयसीडब्ल्यूए’ने केला आहे.
दरम्यान, ‘एआयसीडब्ल्यूए’ने मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याचीदेखील मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी ‘अनुपमा’ आणि इतर सहयोगी प्रोडक्शनच्या सेटवरील शूटिंग पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगित करण्याची मागणीदेखील केली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी नेमका काय निकाल लागणार? हा खरंच निष्काळजीपणा होता का? हे लवकरच कळेल.