सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : प्रसाद जवादेने बायकोसाठी बनवला खास पदार्थ, रेसिपीही दाखवली, घरातलं किचन आहे इतकं स्वच्छ व मस्त, व्हिडीओ पाहाच

Saurabh Moreby Saurabh More
जून 1, 2024 | 2:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paru fame Prasad Jawade shared video on social media of cooking a special dish for his wife Amruta Deshmukh

Video : प्रसाद जवादेने बायकोसाठी बनवला खास पदार्थ, रेसिपीही दाखवली, घरातलं किचन आहे इतकं स्वच्छ व मस्त, व्हिडीओ पाहाच

‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस’ या शोमध्ये असताना या अमृता-प्रसाद या कलाकारांची एकमेकांबरोबर मैत्री झाली आणि त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी शाही विवाह करत एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. या कलाकारांचे एकमेकांवर खूप प्रेम असल्याचे कायमच दिसून आले आहे. सोशल मीडियावरील फोटो व व्हिडीओद्वारे त्यांनी त्यांचे प्रेम कायमच दाखवले आहे.

अमृता-प्रसाद ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यांचे काही खास फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच अमृता व प्रसादने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसादने अमृतासाठी एक स्पेशल डिश बनवत तिला खाऊ घालण्याचा बेत केला होता आणि याचीच एक झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमधून दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये प्रसादने अमृतासाठी ब्रेड-ऑमलेट बनवले असून हे ऑमलेट त्याने विशिष्ट प्रकारे बनवले असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

आणखी वाचा – कुठे गायब झाली ‘तारक मेहता…’मधील अंजली भाभी?, आता फक्त देवभक्तीमध्ये आहे तल्लीन, नेमकं कसं जगत आहे आयुष्य?

यामध्ये प्रसाद अमृतासाठी ऑमलेट बनावट असताना अमृता मागून येते आणि त्याचा व्हिडीओ करते. यादरम्यान त्यांच्यातील संवादही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये प्रसाद ऑमलेटवर बटर लावलेले टोस्ट ठेवतो. यानंतर तयार झालेला पदार्थ अमृताला खाण्यासाठी देतो. यावर अमृताही प्रसादने केलेल्या या ब्रेड-ऑमलेटचे कौतुक करत त्याने बनवलेल्या ऑमलेटवर मस्तपैकी ताव मारते. तसेच या व्हिडीओमध्ये अमृता प्रसादला “तू सर्वांना मी स्वयंपाक करायला शिकावं असं का म्हणत असतो” असं म्हणते. यावर अमृता “तुझ्यासाठी” असं म्हणतो. त्यावर अमृता पुन्हा मजेत “माझ्यासाठी ‘स्विगी’ आहे ना?” असं म्हणते.

आणखी वाचा – Video : घोडबंदर रोडवरुन शूटला जात असताना मराठी कलाकारांचे हाल, गाड्या दोन-दोन तास एका जागी उभ्या अन्…; अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत

दरम्यान, प्रसाद-अमृता यांच्या अनेक व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांकडून नेहमीच चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. त्याचप्रकारे या व्हिडीओलाही चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. “मनासारखा जोडीदार भेटायला भाग्य लागतं”, “किती गोड”, खूप छान”, “तुम्ही दोघे खूपच गोड आहात” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या व्हिडीओचे कौतुक केले आहे.   

Tags: amruta deshmukhmarathi entertainment newsprasad jawade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Next Post
Kranti Redkar Funny Video With Husband

Video : क्रांती रेडकर एकापाठोपाठ एक बोलत होती खोटं, नवऱ्याने तोंड वाकड करत कॅमेऱ्यासमोरच बायकोला ठरवलं खोटं, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.