शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hitlerla : पहिल्या पाडव्याला लीलाने ऐजेसाठी आणलं खास गिफ्ट, खास भेटवस्तूचा अर्थही समजावून सांगितला, प्रेमाला नवी दिशा मिळणार

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 9, 2024 | 3:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla Marathi serial updates Leela gives AJ a smiley ball as a gift on Diwali Padwa

लीलाने एजेला दिवाळी पाडव्यानिमित्त दिलं ही खास गिफ्ट, दोघांमधील प्रेम बहरायला सुरुवात

Navri Mile Hitlerla Marathi Serial : नुकतीच दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला असला तरी मराठी मालिकांमध्ये अजूनही दिवाळी साजरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतही सध्या दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीला व एजे यांची दिवाळी साजरी होतानाचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. (Navri Mile Hitlerla Serial Updates)

मालिकेच्या शुक्रवारच्या भागात लीला एजेंना उटणं लावण्यासाठी बोलवायला जाते. मात्र, एजे तिला नाही म्हणत असतो. तरीही लीला हट्ट धरते. एजे तिला म्हणतो, “तुला सांगितलं ना, मी असलं काही करणार नाही”, त्यावर लीला म्हणते, “चूपचाप पाटावर बसा, नाहीतर जो माझं ऐकतो, त्याला मी बोलवेन.” तेवढ्यात त्यांचा टायगर नावाचा कुत्रा पळत येतो आणि एजेच्या कपड्यांना धरून त्याला ओढत पाटावर घेऊन जातो. त्यानंतर लीला एजेला उटणे लावते. दिवाळीला नवऱ्याने बायकोला गिफ्ट देण्याची पद्धत आहे. मात्र एजे व लीला यांच्या दिवाळी पाडव्याला एजेंऐवजी लीलाच त्याला गिफ्ट देणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ‘भुल भूलैय्या’च्या साँग लाँचला सोनू निगमकडे दुर्लक्ष, सगळे कार्तिक आर्यनकडेच धावत गेले अन्…; अपमानास्पद वागणूक

झी मराठीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात एजे व लीला यांच्या दिवाळी पाडव्याचे क्षण दाखवण्यात आले आहेत. यावेळी लीला एजेंना पहिल्या पाडव्यानिमित्त ओवाळते. मग आजी एजेला “पहिल्या पाडव्यानिमित्त लीला छानशी ओवाळणी दे” असं म्हणतात. यावर एजे “सॉरी मी काही गिफ्ट आणलं नाही” असं म्हणतो. यावर लीला असं म्हणते की, “यावेळी मीच एजेंना एक गिफ्ट देणार आहे” असं म्हणते. लीलाने दिलेलं गिफ्ट बघून खरंतर एजेंना राग येतो.

आणखी वाचा – “माझी भिकाऱ्यासारखी अवस्था”, भारत सो़डून गेली राखी सावंत, अटक होण्याच्या भीतीने बिकट परिस्थिती, म्हणाली, “किती भीक मागणार?”

पण लीला त्यांना त्या गिफ्टचा अर्थ समजावून सांगत असं म्हणते की, “तुम्ही याकडे बघितलं तर तुम्हाला कायम याची जाणीव होईल की माणसाने कायम हसलं पाहिजे आणि एजे तुम्हाला राग आला की तुम्ही बझर दाबता. मग त्यापेक्षा आता तुम्हाला राग आला तर की हा स्माईली बॉल हातात धरा आणि दाबा”. मालिकेचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.    

Tags: Marathi Serial NewsNavri Mile Hitlerla Marathi SerialNavri Mile Hitlerla Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Nataša Stanković on son

हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली नताशा, लेकाचा केला उल्लेख, म्हणाली, "मुलाने आम्हा दोघांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.