बॉलिवूड अभिनेत्री व ड्रामा क्वीन म्हणून लोकप्रिय असलेली राखी सावंत सोशल मीडियावर काहीना काही कारणाने चर्चेत राहत असते. राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून भारतात राहत नाहीये. ती बऱ्याच दिवसांपासून दुबईत आहे. पती आदिल खान दुर्रानीने केलेल्या तक्रारीमुळे राखीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने ती भारतात परतत नाही आणि याचा खुलासा राखीने स्वत:चं केला आहे. याबद्दल बोलताना राखी म्हणाली की, जर तिला अटक झाली तर शाहरुख खान आणि सलमान खान तिला मदत करतील पण ती त्यांची मदत घेणार नाही. (Rakhi Sawant Arrest Fear)
‘इन्स्टंट बॉलीवूड’शी संवाद साधताना राखी सावंतने भारतात न परतण्याचे कारण सांगितले. भारतात परत आल्यास तिच्यावर प्रलंबित असलेल्या खटल्यामुळे पोलीस तिला अटक करतील अशी तिला भीती वाटत आहे. याबद्दल राखी असं म्हणाली की, “मी कोणाची मदत मागत नाही, ही माझी लढाई आहे. सलमान भाई, फराह खान आणि शाहरुख जी मला एका सेकंदात जामीन देतील. पण मी कोणाची मदत मागत नाही. हा माझा लढा आहे, किती दिवस मी सर्वांसमोर हात पसरत राहणार, किती दिवस भीक मागत राहणार. मी आता भिकारी झाली आहे. माझा भारतातील न्यायालयांवर विश्वास आहे. कारण मी कोणतीही चूक केलेली नाही”.
यापुढे ती म्हणाली की, “माझी चूक नसतानाही मी भिकाऱ्यासारखी परिस्थितीला तोंड देत आहे. पण मी कोणाचीही मदत मागणार नाही. न्यायालयाच्या आदेशामुळे मला घरोघरी भटकावे लागत असल्याने अक्षरश: माझी अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आहे”. काही काळापूर्वी राखी सावंतने दुबईतून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती रडताना आणि मदत मागताना दिसली होती. या व्हिडीओमध्ये राखी पंतप्रधान मोदी आणि भाजपकडे मदतीची याचना करताना दिसली होती.
आणखी वाचा – Video : पायऱ्या उतरताना विजय देवरकोंडाचा गेला तोल, थेट घसरतच खाली आला अन्…; व्हिडीओ व्हायरल
यावेळी तिने सांगितले होते की तिला तिच्या देशात परत यायचे आहे, परंतु हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा तिला जामीन मिळेल आणि कोणत्याही कायदेशीर अडथळ्याशिवाय ती देशात परत येऊ शकते. माझे निर्दोषत्व सिद्ध करणारे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तरीही मला का गोवले जात आहे? माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. अशा प्रतिक्रिया तिने व्यक्त केल्या आहेत.