भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व त्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हीक सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी दोघंही वेगळे झाले असून याबद्दलची अधिकृत घोषणादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. यानंतर दोघांचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील समोर आले. या सगळ्यामध्ये लक्ष वेधले ते त्यांचा मुलगा अगस्त्यमुळे. हार्दिक व नताशा वेगळे झाल्यानंतर त्यांचा मुलगा दोघांकडेही दिसून येतो. वेगळे झाले असले तरीही दोघंही त्याचा खूप प्रेमाने सांभाळ करताना दिसतात. मुलाच्या सांभाळ करण्यावर नताशाने नुकतेच आता भाष्य केले आहे. ती नक्की काय म्हणाली? मुलाचा सांभाळ करताना नक्की कोणते प्रसंग समोर येतात याबद्दलदेखील नताशा व्यक्त झाली आहे. (Nataša Stanković on son)
नताशा व हार्दिक वेगळे झाल्यापासून अनेक टीकादेखील होताना दिसून येत आहे. मात्र ती कोणत्याही टीकेला उत्तर देत नाही. हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर नताशा मुलाला घेऊन सार्बियाला निघून गेल्याच्या अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र यावरदेखील तिने खुलासा केला आहे. ती म्हणाली की, “कुटुंब इथे आहे. आम्ही एकत्र कुटुंबं आहोत. आम्हाला एक मुलगा आहे आणि नेहमीच तो आम्हाला एकाच कुटुंबामध्ये बांधून ठेवतो. मी आजवर काहीही केलं नाही. कारण आमच्या मुलाला आई-वडिलांबरोबर एकत्र राहायचे आहे. मी सार्बियाला गेले तरीही भारतात असलेल्या अगस्त्यकडे नेहमी लक्ष असते”.
तसेच एक साधारण आयुष्य जगायची इच्छा असल्याचेदेखिल नताशाने सांगितले. लाइमलाइटमध्ये राहायलादेखील जास्त आवडत नसल्याचे सांगितले. ती म्हणाली की, “लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याचा मला जास्त फरक पडत नाही. मी माझं आयुष्य सुखात जगत आहे”. नताशा व हार्दिकने २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात गुपचूप लग्न केले होते. नंतर दोघांनीही मोठ्या थाटात लग्न केले. मात्र आता दोघेही चार वर्षांनंतर वेगळे झाले आहेत.
आणखी वाचा – “माझी भिकाऱ्यासारखी अवस्था”, भारत सो़डून गेली राखी सावंत, अटक होण्याच्या भीतीने बिकट परिस्थिती, म्हणाली, “किती भीक मागणार?”
४ मार्च १९९२ रोजी सर्बियामध्ये जन्मलेल्या नताशाने वयाच्या १७व्या वर्षी नृत्य शिकले आणि तेव्हापासून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. नताशाने प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ (२०१३) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर नताशा २०१४ साली ‘बिग बॉस ८’ मध्येही दिसली होती आणि तिने ‘नच बलिए ९’ मध्येही सहभाग घेतला होता. २०१८ मध्ये नताशा बादशाहच्या ‘डीजे वाले बाबू’ या सुपरहिट गाण्यात अभिनेत्री म्हणूनही दिसली होती.