शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hitlerla : लीलाच्या हट्टामुळे एजे साजरी करणार दिवाळी, अंतरानंतर पहिल्यांदाच होणार पाडवा, दोघांचे नातं फुलणार

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 8, 2024 | 12:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla Marathi serial updates AJ will celebrate Diwali Padwa for Leela's insistence

Navri Mile Hitlerla मालिकेत लीलाच्या हट्टामुळे एजे साजरा करणार दिवाळी पाडवा

छोट्या पडद्यावरील  ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीलाने जहागीरदारांचे घर सोडले. लीलाने एजे व अंतराच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असून तिने अंतराचे जुनी साडीही परिधान केली होती. पण हीच गोष्ट एजेला आवडली नसून यावेळे एजेंनी तिला या घरात नीट वागायचे नसेल तर घर सोडून जा असं म्हटलं. यावर लीलाने घर सोडले. (Navri Mile Hitlerla Serial Updates)

एजे व लीला यांचे लग्न झाले असले तरी एजेंनी अजून लीलाचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला नाही. मात्र नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये एजे लीलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत तिचा बायको म्हणून स्वीकार केला. जहागीरदारांच्या घरात दिवाळीच्या पूजेनिमित्त सगळे जमलेले असतात. पण या पूजेला लीला नसते. तेव्हा एजे तिच्याबद्दल आईला विचारतात. त्यांतर एजे स्वत: लीलाला बोलवण्यासाठी जातात. तेव्हा लीला आपल्या मनातील खंत एजेंना बोलून दाखवते. अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात लीला आता एजेंबरोबर दिवाळी पाडवा साजरा करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : अमेरिका दौऱ्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या शुटींगला पुन्हा एकदा सुरुवात, प्राजक्ता माळीने शेअर केला खास व्हिडीओ

झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये लीला एजेंना पाडव्यासाठी उटणं लावायला त्यांच्या खोलीतून खाली सर्वांसमोर घेऊन येते. यावर एजे तिला “मी असं काहीही करणार नाहीये” म्हणतात. पण लीला त्यांना दम देत “गपचूप पाटावर बसा नाहीतर जो माझं ऐकतो त्याला मी बोलवेन” असं म्हणत त्यांच्या पाळीव श्वानाला बोलवते. त्यानंतर एजे शेवटी पाटावर उटणं लावण्यासाठी बसतात आणि लीला त्यांना उटणं लावत त्यांचा पहिला दिवाळी पाडवा साजरा करते.

आणखी वाचा – “हिंमत असेल तर…”, गेल्या २० दिवसांत सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून पाचवी धमकी, म्हणाले, “गाणं लिहिणाऱ्याला…”

दरम्यान, मालिकेचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच मालिकेच्या चाहत्यांनी या प्रोमोला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या प्रोमोखाली एकाने “हे दोघे मला खूप आनंदित करतात” असं म्हटलं आहे तर आणखी एकाने “किती गोड आहेत लीला आणि एजे” अशी कमेंट केली आहे. तर  काहींनी या नवीन ट्विस्टसाठी उत्सुकता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर काहींनी त्यांना एजे व लीला यांच्यातील प्रेमकहाणी बहरत असल्याचे आवडत आहे असं म्हटलं आहे

Tags: Marathi Serial NewsNavri Mile Hitlerla Marathi SerialNavri Mile Hitlerla Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte marathi serial fame actor Milind Gawli said that this role came to me when I was thinking of retirement

“रिटायर झालो होतो पण...”, ‘आई कुठे...’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचे स्वत:च्या भूमिकेविषयी भाष्य, म्हणाले, “काही महीने घरी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.