छोट्या पडद्यावरील सर्वांचा आवडता विनोदी कार्यक्रम म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम. या कार्यक्रमामुळे अनेक विनोदी कलाकार प्रकाशझोतात आले आहेत. गेली सहा वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. कोरोना काळातदेखील या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. नंतर या कार्यक्रमाने भारताबाहेरही अनेक कार्यक्रम केले. अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अशा अनेक देशांमध्ये कार्यक्रम करत परदेशी प्रेक्षकांचेही मनोरंजन या कार्यक्रमाने केले आहे. हे सगळे शो हाऊसफुलदेखील झाले. अशातच या टीमने नुकतंच अमेरिका दौराही केला. (Maharashtrachi Hasyajatra Shooting Started)
१९ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबरपर्यंत हा अमेरिका दौरा होता. या दौऱ्याला दत्तू मोरे, रसिका वैगुर्लेकर, इशा डे, प्रभाकर मोरे, चेतना भट, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, ओमकार राऊत, नम्रता संभेराव यांसारखे कलाकार गेले होते. या कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या दौऱ्याचे काही खास फोटो व व्हिडीओ पोस्ट केले होते. मात्र आता ही सगळे अमेरिकेहहून मायदेशी परतले आहेता आणि त्यांनी पुन्हा एकदा आगामी सीझनसाठी शूटिंगही सुरू केली आहे आणि या शूटिंगची झलक अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
आणखी वाचा – 08 November Horoscope : रवि योगाचा शुभ संयोगामुळे वृषभ राशीसह ‘या’ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ, जाणून घ्या…
प्राजक्ता माळीदेखील तिच्या ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती आणि अखेर तीदेखील या शोमध्ये पुन्हा परतली आहे आणि याची झलक तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये तिने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सर्व टीमसह व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये प्रभाकर मोरे, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, ओंकार राऊत, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, श्याम राजपूत, ईशा डे, वनिता खरात आणि चेतनाभट अशी सगळी मंडळी पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम डीपी दादासाठी इरिनाने बनवलं खास मटण, त्यानेही ताव मारला अन्…; म्हणाली, “भावा नुसतं….”
या व्हिडीओमध्ये प्राजक्ता या सर्व टीमसह आम्ही पुन्हा आलो आहोत असं म्हणते. त्यानंतर सर्व मंडळी एकच जल्लोष करतात. त्यानंतर प्राजक्ता सई ताम्हणकर व प्रसाद ओक यांच्याकडे कॅमेरा घेते. पुढे नम्रता या व्हिडीओमध्ये आगामी सीझनबद्दल माहिती देत असं म्हणते की, “दोन डिसेंबरपासून सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर. महाराष्ट्राची हास्यजत्रा. कॉमेडीची हॅटट्रीक”. दरम्यान, काही महिन्यांमुळे या शोच्या अमेरिकेच्या दौऱ्यामुळे टीव्हीवर तो ऑफ एअर गेलेला, पण आता विश्रांतीनंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे