शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गणपती बाप्पासमोर लीला प्रेमाची कबुली देणार, लालबागच्या भरगर्दीत झालं शूट, मंडपात आली तेव्हा…

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 18, 2024 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla marathi serial Leela confessing her love to AJ new promo shared on social media.

Navri Mile Hitlerla मालिकेत मुंबईच्या राजासमोर लीला एजेला देणार प्रेमाची कबुली, नवीन प्रोमो व्हायरल

Navri Mile Hitlerla : झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिकांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापैकीच एक मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या अनेक रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत एजे व लीला यांचे मनाविरुद्ध लग्न झाल्याचे पाहायला मिळाले. मनाविरुद्ध झालेल्या एजे व लीला यांच्या लग्नामुळे त्यांच्यातील प्रेमकहाणी आता हळूहळू बहरत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Navri Mile Hitlerla Marathi Serial)

सुरुवातीला एजेंच्या मोठ्या मुलानेच तिचे आपल्या वडिलांविरोधात कान भरले होते. त्यामुळे ती त्यांच्याशी तुटक वागायची. पण आता हळूहळू ती त्यांच्या प्रेमात पडू लागली आहे. एजेंचा शिस्तप्रिय स्वभाव या विरुद्ध अल्लड स्वभावाची लीला ही जोडी अगदीच एकमेकांसाठीची परफेक्ट जोडी असल्याचे प्रत्येकाच म्हणणं होतं. दोघांचे स्वभाव हे वेगवेगळे असले तरी अट दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटत असल्याचे पहायला मिळत आहे. लीला अल्लड असली तरीही चांगली मुलगी आहे हे एजेंना पटू लागले आहे आणि एजे कितीही शिस्तप्रिय असले तरीही त्यांच्यात सुद्धा एक प्रेमळ माणूस असल्याची जाणीव लीलाला होऊ लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – अब्दू रोजिकचे लग्न मोडलं, पाच महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा, म्हणाला, “योग्य वेळ आल्यावर…”

अशातच आता यांच्यातील प्रेम आणखी बहरणार असल्याचे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेतील या नवीन ट्विस्टचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यातून लीला गणपती बाप्पाकडे तिच्या एजेंविषयीच्या भावना व्यक्त करणार आहे. गणेशोत्सवानिमित्तच्या स्पेशल भागात या मालिकेचे शूटिंग मुंबईचा राजा गणेश मंडळात पार पडले. या गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजासमोर लीलाने तिचे एजेंवर प्रेम असल्याचे कबूल केले. मालिकेचा हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Deadpool & Wolverine आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

या नवीन प्रोमोमध्ये लीला व एजे हे दोघे गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तिथल्या गर्दीत हरवतात. त्यानंतर एजे लीलाची शोधाशोध करतात. या शोधाशोधीमध्ये लीला तिचे एजेवर प्रेम असल्याची जाणीव होते आणि यावेळी ती मला काय झालं आहे. मला सतत वाटतं की एजेंनी माझ्या जवळ असावं आणि त्यांनी माझा हात कधीच सोडू नये”. यानंतर ती गणपती बाप्पासमोर “मी एजेंच्या प्रेमात पडली आहे’ असं म्हणत कबुली देते.

Tags: Leela AJ Confess Lovemarathi serialNavri Mile Hitlerla
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
mugdha karnik emotional post

"बाबा अशी कशी विसरले मी?", 'पारू'मधील अहिल्यादेवी वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाली, "आज तू असता तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.