शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अब्दू रोजिकचे लग्न मोडलं, पाच महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा, म्हणाला, “योग्य वेळ आल्यावर…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 18, 2024 | 4:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 16 fame abdu rozik marriage broke up after 5 months of engagement know the reason

‘बिग बॉस १६’ फेम अब्दू रोजिकचे लग्न मोडलं, पाच महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा, नेमकं कारण काय?

Abdu Rozik Marriage : ‘बिग बॉस १६’ या शोमुळे तजाकिस्ताचा गायक अब्दू रोजिक प्रसिद्धीझोतात आला. त्याची फॅन फॉलोविंगही तगडी आहे. अब्दू रोजिक हा ‘हिंदी बिग बॉस मध्ये तो धमाका करताना दिसला. अब्दू रोजिक ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याची भारतामधील फॅन फॉलोइंगही चांगलीच वाढली असल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉस हिंदी मुळे चर्चेत आलेला अब्दू काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आला होता. ‘बिग बॉस १६’ फेम अब्दू रोजिक लग्न करणार होता. ०७ जुलै रोजी त्यांचे लग्न होणार होते. पण काही कारणाने त्याचे हे लग्न पुढे ढकलले गेल्याचे म्हटलं गेलं. (Abdu Rozik Marriage Brokeup)

अब्दूने त्याच्या साखरपुड्याचे काही खास फोटोही सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. मात्र आता त्याचे हे लग्न मोडलं आहे. याबद्दल त्याने ‘ई-टाइम्स’शी संवाद साधला आणि या संवादात त्याने त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी अब्दूने सांगितले की, त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे त्याच्यासाठी खूप महत्वाचे नाते होते. पण सांस्कृतिक भिन्नतेमुळे त्यांना त्यांच्या नात्याला पुढे घेऊन जाणे कठीण झाले. त्याचबरोबर त्याच्यासाठी हे नाते तोडणे अजिबात सोपे नव्हते.

View this post on Instagram

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

आणखी वाचा – Video : गावी अमरावतीला पोहोचली Bigg Boss Marathi फेम आर्या, लेकीला पाहताच आई ढसाढसा रडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

याबद्दल अब्दू असं म्हणाला की, “’आमचे नाते जसजसे विकसित होत होते, तसतसे सांस्कृतिक फरक दिसून येत होते. त्यामुळे आम्हाला लग्नाबद्दल निर्णय बदलावा लागला. माझ्या आयुष्यात मला दररोज किती अडचणी येतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर असणारा आणि पुढच्या प्रवासात त्याला साथ देणारा जोडीदार हवा. मला खात्री आहे की योग्य वेळ आल्यावर मला पुन्हा प्रेम मिळेल. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी मी सर्वांचे आभार मानतो”.  

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आधी डीपी घराबाहेर जाणार म्हटलं आता मराठी अभिनेत्याचा युटर्न, नेटकऱ्याने सुनावताच म्हणाला, “खेळ सुधारला म्हणून…”

दरम्यान, अब्दू रोजिकने एप्रिलमध्ये शारजाह, दुबईमध्ये अमीराबरोबर साखरपुडा केला होता. २४ एप्रिल २०२४ रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. २० वर्षांचा अब्दू ०७ जुलै रोजी अमीरातीबरोबर लग्न करणार होता. पण बॉक्सिंगच्या सामन्यामुळे हे लग्न पुढे ढकलले  गेले . तरीही तो सामना हरला आणि अशातच आता त्याचे लग्नही मोडले आहे.

Tags: abdu rozikabdu rozik marriage broke upBigg Boss 16 fame abdu rozik
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
sunny deol fun with mom-dad

Video : पहिल्या पत्नीसह फिरायला गेले धर्मेंद्र, हेमा मालिनी मात्र त्यांच्यापासून दूर, सनी देओलचीही मिळाली साथ अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.