बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाबा अशी कशी विसरले मी?”, ‘पारू’मधील अहिल्यादेवी वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाली, “आज तू असता तर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 18, 2024 | 5:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mugdha karnik emotional post

मुग्धा कर्णिक वडिलांच्या आठवणीत झाली भावुक

सध्या ‘पारू’ ही मालिका खूप चर्चेत असलेली पहायला मिळत आहे. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. सध्या ही मालिका तिच्या कथानकामुळे गाजत आहे. या मालिकेतील पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. विशेषतः या मालिकेतील अहिल्यादेवी या पात्राने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. अहिल्यादेवी या पात्राचं मालिकेत महत्त्वाचं स्थान असलेलं पाहायला मिळत आहे. सर्वाधिक वजनदार अशी भूमिका या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांची आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर बोलतील तो शेवटचा शब्द असतो. त्यांच्या शब्दाबाहेर कोणतीच गोष्ट होत नसल्याने अहिल्यादेवी यांची मुख्य अशी भूमिका मालिकेत दाखविण्यात आली आहे. (mugdha karnik emotional post)

अहिल्यादेवी ही भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहे. करारी नजर, कठोर स्वभाव, ही अहिल्यादेवी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मुग्धा कर्णिक हिने अहिल्यादेवी या पात्रातून प्रेक्षकांच्या मनात यशस्वी अशी छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर देखील मुग्धा अधिक प्रमाणात सक्रिय असलेली पाहायला मिळते. खासगी आयुष्यातील अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसते.

आणखी वाचा – कंगना रणौत लवकरच लग्न करणार, स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाली, “आताच लग्न करुन फायदा अन्यथा…”

View this post on Instagram

A post shared by Mugdha Karnik (@mugdha_karnik)

नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिने वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती वडिलांच्या आठवणीमध्ये भावुक झालेली दिसून येत आहे. तिने वडिलांचा फोटो शेअर करत लिहिले की, “बाबा, अशी कशी विसरले मी? विसरुच कशी शकले? खरतर मी तुला विसरण्यापेक्षा हा दिवस विसरले. एखाद्याची आठवण काढण्यासाठी त्याला विसरावं लागतं. पण असा एकही दिवस नसतो जेव्हा माझ्या मनात तुझा विचार येत नाही. मी जे काही करते, मिळवते, माझं लहानातलं लहान यश आणि माझी मोठ्यातली मोठी मिळकत तुझ्याशिवाय अपूर्णच वाटणार”.

आणखी वाचा – गणपती बाप्पासमोर लीला प्रेमाची कबुली देणार, लालबागच्या भरगर्दीत झालं शूट, मंडपात आली तेव्हा…

पुढे तिने लिहिले की, “हे सगळं मिळवताना तुला माझा किती अभिमान वाटला असता? किती आनंद झाला असता? याचा विचार करुन मन शांत करते आणि आयुष्य पुढे असच चालू राहणार, आय मिस यु”. दरम्यान या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.  

Tags: marathi serialmugdha karnikpaaru
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Bigg boss marathi fame pushkar jog shared Instagram story about his death and grab attention know what he exactly said

"मी मेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाला, "मानसिकरित्या खचतो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.