कलाकार मंडळी अभिनयाबरोबरच त्यांच्या आवडीनिवडी जोपासताना दिसतात. बरीचशी कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाच्या आवडीबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही कार्यरत असतात. असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयाबरोबरच व्यावसायिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. अशातच आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने व्यवसायात क्षेत्रात पदार्पण केले आहे. सोशल मीडियावरुन त्यांनी याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम प्रसाद लिमये. प्रसादने नवं हॉटेल सुरु केलं असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. (Prasad Limaye Shared Goodnews)
नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील किशोर जहागीरदार म्हणजे अभिनेता प्रसाद लिमयेने चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे. प्रसाद आता अभिनयाचं काम सांभाळत व्यवसाय देखील करणार आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रसादने हॉटेल व्यवसाय पाऊल ठेवलं आहे. अभिनेत्याने ठाण्यात स्वतःचं हॉटेल सुरु केलं आहे. ‘अन्नपूर्णा’ असं प्रसादच्या हॉटेलचं नाव असून त्याने एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “गणपती बाप्पा मोरया…अन्नपुर्णा प्रसन्न…अन्न हे पुर्णब्रह्म… जगात खाण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि तोच आनंद द्विगुणीत करायला आम्ही घेऊन येत आहोत खास ठाणेकरांसाठी ‘अन्नपुर्णा’ची मेजवानी. ‘अन्नपुर्णा’ क्लाऊड किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस आहे. घरबसल्या सुग्रास भोजनाची रुचकर पर्वणी. तुमच्या आवडीचे मराठमोळ्या पद्धतीचे तसेच नॅार्थईंडियन, साऊथईंडियन, चायनिज, तंदुर, चाट, फास्टफुड पदार्थ ॲार्डर करा आणि उत्कृष्ट जेवणासह तुमच्या कार्यक्रमाला खास बनवा”, असं हटके कॅप्शन देत अभिनेत्याने नव्या हॉटेलची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे.
आजवर प्रसादने ‘पुढचं पाऊल’, ‘नकळत सारे घडले’ या मालिकांमधून आणि ‘बेधडक’, ‘What’s up लग्न’, ‘मोगरा फुलला’, ‘फतेशिकस्त’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आता अभिनयाबरोबरचं प्रसाद व्यवसाय क्षेत्रात उतरला आहे. प्रसादच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.