सलमान खानचा सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ नेहमीच चर्चेत असलेल्या कार्यक्रमापैकी एक आहे. या शोच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे, ज्यासाठी सलमान खानही फिल्मसिटीमध्ये स्पॉट झाला होता. हा रिऍलिटी शो लवकरच सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या शो संबंधित काही नवीन अपडेट्स समोर आल्या आहेत. या शोच्या थीमपासून स्पर्धकांची नावे आणि प्रीमियरची तारीख देखील समोर आली आहे. (Bigg Boss 18 Update)
बऱ्याच दिवसांपासून या शोची चर्चा होत असल्याने, ‘बिग बॉस १८’चा प्रीमियर ५ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. ‘बिग बॉस १८’ सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये प्रसारित होईल, अशी अटकळ अनेक दिवसांपासून होती. पण ते कोणत्या दिवसापासून प्रसारित होणार याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र, सलमान खानने नव्या पर्वाचा प्रोमो शूट केला असून लवकरच त्याचा प्रीमियर जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी ‘बिग बॉस’च्या घराची थीम भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याभोवती फिरणारी आहे. मागील सीझनमधील अनेक स्पर्धक या शोचा भाग असतील असाही अंदाज आहे. अशा परिस्थितीत शोमध्ये माजी स्पर्धकांना पुन्हा पर्वात पाहून मनोरंजक असेल. या सीझनसाठी अनेक सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यात आला होता, परंतु अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नावे समोर आलेली नाहीत. शोसाठी शोएबचे नाव पुढे आले होते पण त्याने नकार दिला. याशिवाय सध्या अलिशा पनवार, रीम शेख, शाहीर शेख, सुरभी ज्योती आणि समीरा रेड्डी यांनाही संपर्क करण्यात आला आहे.
‘स्प्लिट्सव्हिला १५’ चे अनेक स्पर्धक जसे की जशवंत बोपण्णा आणि आकृती नेगी या शोचा एक भाग असू शकतात अशीही बातमी आहे. याशिवाय दिग्विजय राठी, कशिश कपूर, सिव्हेट हे देखील निर्मात्यांशी चर्चा करत आहेत. सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याचे नाव ‘सिंघम अगेन’मध्ये दिसत आहे. त्याचबरोबर तो ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंगही करत आहे.