शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एजे तिळासारखे कडू आणि…”, लीलाचा एजेंसाठी हटके उखाणा, म्हणाली, “आमच्या लुडबूड करणाऱ्यांची…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 13, 2025 | 12:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla fame leela took special ukhana for aj Makar Sankranti video viral on social media.

लीलाने एजेसाठी घेतला खास मकर संक्रांत स्पेशल उखाणा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत असतात. धांदरट लीला व शिस्तप्रिय एजे यांची ही अनोखी जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावते. त्यामुळे दोघांमधील केमिस्ट्री पाहण्यात प्रेक्षकांना चांगलाच आनंद मिळतो. मालिकेत नुकतीच एजेला अखेर जाणीव झाली आहे की त्याचं लीलावर प्रेम आहे. लीलावरचे प्रेम जाहीर करण्यासाठी एजे कष्टही घेताना दिसत आहेत. अशातच आता लीलाने एजेसाठी खास उखाणा घेतल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. झी मराठीच्या एका खास कार्यक्रमात लीलाने एजेसाठी हा उखाणा घेतला आहे. (leela makar sankrant ukhana)

‘झी मराठी’ वाहिनीवर मकरसंक्रांत विशेष कार्यक्रम पार पडला. यामध्ये वाहिनीवरील सगळ्या मालिकांमधले कलाकार एकत्र येऊन संक्रांत साजरी करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मालिकेच्या प्रत्येक मुख्य अभिनेत्रींनी आपल्या जोडीदारांसाठी खास उखाणे घेतले आणि याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी लीलानेही एजेसाठी खास उखाणा घेतला. तिचा हा उखाणा ऐकून सर्वजण तिचं कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम सोढीची तब्येत आणखीनच खालावली, अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाली, “माझी बहीण वारली तेव्हा…”

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये लीला एजेसाठी उखाणा घेत असं म्हणते की, “एजे हे खास तुमच्यासाठी. एजे तिळासारखे कडू, मी गुळासारखी गोड, एजे तिळासारखे कडू, मी गुळासारखी गोड… आमच्यात लुडबूड करण्याऱ्यांची मी मोडेन चांगलीच खोड”. तिच्या या उखाण्याला ‘सावल्याची जणू सावली’ मधली सावली, ‘लाखात एक आमचा दादा’मधील तुळजा व पारू देत कौतुक करतात.

आणखी वाचा – ‘बाहुबली’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याकडून हॉटेलची तोडफोड अन् नुकसान, परिवारातील अन्य सदस्यांवरही गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

लीलाचा हा खास उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच तिचा हा उखाणा नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे. “क्या बात है”, “खूपच छान”, “भारी”, “मस्तच”, खूप छान उखाणा” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, मालिकेत नुकतंच लीलाच्या मित्राची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता या नवीन मित्राच्या एन्ट्रीने दोघांच्या नात्यावर काय परिणाम होणार? हे लवकरच पाहायला मिळेल.         

Tags: leela makar sankrant ukhanaleela took special ukhana for ajnavri mile hitlerla fame leela
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
kushal tondon and shivangi joshi wedding photos

‘ये रिश्ता…’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशी व कुशल टंडनने गुपचूप केलं लग्न?, फोटो व्हायरल होताच चाहत्यांना धक्का

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.